t20 world cup ind vs ban weather forecast team india  sakal
क्रीडा

T20 World Cup: टीम इंडियावर मोठं संकट, 'या' एका कारणामुळे वर्ल्ड कप मधून होऊ शकते गच्छंती

टीम इंडियासाठी उपांत्य फेरीत प्रवेश करणे अवघड

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 IND vs BAN : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आली आहे. येथून उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला आता पुढील दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. टीम इंडिया आपला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध 2 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळणार आहे, मात्र या सामन्यापूर्वी टीमसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिका 3 सामन्यात 5 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया आपल्या चौथ्या सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे, परंतु पावसामुळे या सामन्यात अडथळा येऊ शकतो. हवामान खात्यानुसार, भारताच्या सामन्याच्या दिवशी अॅडलेडमध्ये पावसाची 60% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असणार आहे. पावसामुळे हा सामना झाला नाही तर टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीत मागे पडू शकते.

टीम इंडियाला आता बांगलादेश आणि झिम्बाब्वे विरुद्ध सामने खेळायचे आहेत. बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे खेळला गेला नाही, तर टीम इंडियाला झिम्बाब्वेविरुद्धचा प्रत्येक पराभव जिंकावा लागेल. बांगलादेश आणि झिम्बाब्वे देखील उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत, तर टीम इंडियाचा पराभव झाल्यास पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT