T20 World Cup match sakal media
क्रीडा

T20 World Cup : सराव सामन्यांनी अंदाज आला

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला

सुनंदन लेले

दुबई : ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडकाचा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वीच भारताने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या दोन सराव सामन्यांत दणदणीत विजय मिळवला. आधी आयपीएल आणि आता हे दोन सराव सामने यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी अमिरातील संथ खेळपट्ट्यांचा भारतीय खेळाडूंना चांगला अंदाज आला आहे. वार्तांकनासाठी अमिरातीचा प्रवास चालू करण्याआधी पुण्यात एक, त्यानंतर मग विमानाने उड्डाण करण्याअगोदर विमानतळावर आणखी एक आणि अखेरीस दुबई विमानतळावर उतरल्यावर एक अशा तीन कोरोना चाचण्यांची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला प्रत्यक्ष दुबईत प्रवेश मिळाला.

आयपीएल संपताक्षणी भारतीय संघ एकत्र झाला आणि त्यात मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंह धोनीही सामील झाला. एखाद्या सराव सत्रानंतर भारतीय संघाने खेळपट्ट्यांच्या वातावरणाचा आणि संघातील खेळाडूंच्या लयीचा अंदाज यायला दोन सराव सामने खेळणे पसंत केले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने जिंकलेले सराव सामने अगदीच सोपे नव्हते. या सामन्यांमधून भारताला खरा सराव करायला मिळाला. दुबईला पोचल्यावर संघ व्यवस्थापनाशी बोलणे केले असता, दोन्ही सामन्यात भारतीय संघाने बाजी मारल्याचे समाधान जाणवले. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे सर्व खेळाडूंना खेळायला मिळून चांगल्या प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करता आले.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यातही हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नाही आणि अश्विनने दोनच षटके टाकून दोन फलंदाजांना बाद केले. तसेच चक्क विराट कोहलीने दोन षटकांचा मारा करून सर्वांना चकित केले. भारत आणि पाकिस्तानचे अनेक नागरिक आखातात काम करत असल्याने विश्वकरंडकापेक्षा सगळ्यांना २४ तारखेला होणाऱ्या भारत वि. पाकिस्तान सामन्याची उत्सुकता जास्त आहे. दुबई स्टेडियमची प्रेक्षक क्षमता कागदावर २५ हजाराची आहे. त्यातली जेमतेम ५ हजार तिकिटे सामान्य प्रेक्षकांकरीता उपलब्ध होती. ती मिनिटांत संपली. दहा प्रायोजक आणि आयसीसीकरता प्रचंड तिकिटे राखून ठेवली गेली आहेत. उरलेली तिकिटे अतिप्रचंड किंमतीला हॉस्पिटॅलिटीच्या नावाखाली विकली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT