T20 World Cup Logan Van Beek  
क्रीडा

T20 World Cup : 2 आठवड्यांपूर्वी न्यूझीलंडची जर्सी घालून भारताविरुद्ध खेळला; आता थेट संघ बदलला

टी-20 विश्वचषकच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सामन्यादरम्यान नेदरलँडच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

Kiran Mahanavar

T20 World Cup Logan Van Beek : ऑस्ट्रेलियात रविवारी टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन सामने खेळल्या गेले. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा पराभव केला. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने यूएईचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यादरम्यान नेदरलँडच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे नाव लोगान व्हॅन बीक आहे.

लोगान व्हॅन बीक गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड अ संघाचा सदस्य होता. 27 सप्टेंबर रोजी तो भारत अ विरुद्धचा सामनाही खेळला होता. त्यावेळी हा खेळाडू टी-20 विश्वचषकात खेळेल याची कल्पनाही कुणाला नव्हती, पण न्यूझीलंड संघाकडून नाही. नेदरलँडसाठी लोगान व्हॅन बीक मैदानात खेळण्यासाठी उतरला. या मध्यमगती गोलंदाजाने यूएईविरुद्ध दोन षटकांत 19 धावा दिल्या.

व्हॅन बीक 2010 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा सदस्य होता. यानंतर 2014 मध्ये त्याने 2014 टी-20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सकडून पदार्पण केले. त्याने पहिला सामना 14 मार्च 2014 रोजी UAE विरुद्ध खेळला. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली राहिली नाही. सहा सामन्यांत त्याने फक्त दोन विकेट घेतल्या आणि फक्त तीन धावा केल्या. सातव्या सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध नऊ धावांत तीन बळी घेतले. नेदरलँड्सने हा सामना 45 धावांनी जिंकला. व्हॅन बीकने यावर्षी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले.

क्राइस्टचर्चमध्ये जन्मलेल्या व्हॅन बीकचे वडील नेदरलँडचे असल्यामुळे त्यांना तिथे खेळण्याची परवानगी देण्यात आली. त्याने 17 वनडेत 22 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 262 धावा आहेत. त्याचबरोबर टी-20 मध्ये व्हॅन बीकने 17 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: 'गट क' परीक्षेच्या अर्जासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! 'एमपीएससी'चा निर्णय, 2 हजार 929 पदांसाठी भरती

Vasmat Politics: गोवंश प्रकरणातील गुन्ह्यानंतर वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांमधील फरक तसेच त्याशी संबंधित जबाबदाऱ्यांचे स्वरूप, असे अनेक मुद्दे उपस्थित झाले - अनिल देसाई

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT