Syed Mushtaq Ali Trophy  esakal
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy : कर्नाटकाकडून महाराष्ट्राचा पराभव

सय्यद मुश्‍ताक अली टी-२० करंडक

सकाळ वृत्तसेवा

मोहाली : महाराष्ट्राच्या संघाला सय्यद मुश्‍ताक अली टी-२० करंडकाच्या क गटातील सलामीच्या लढतीत कर्नाटक संघाकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. देवदत्त पडीक्कलच्या नाबाद १२४ धावा आणि विधवात काविरप्पा याची प्रभावी गोलंदाजी कर्नाटकच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

कर्नाटककडून मिळालेल्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राला २० षटकांत ८ बाद ११६ धावाच करता आल्या. दिव्यांग हिंगणेकर याने ४७ धावांची खेळी साकारली. शम्सहुझामा काझी याने नाबाद २८ धावांची खेळी केली. पण कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. विधवात काविरप्पा याने १९ धावा देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विजयकुमार विशाक याने २० धावा देत २ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

त्याआधी महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडीक्कल याने ६२ चेंडूंमध्ये नाबाद १२४ धावांची स्फोटकी खेळी साकारली. यामध्ये १४ चौकार व ६ षटकारांचा समावेश होता. मनीष पांडे या अनुभवी फलंदाजाने ५० धावांची खेळी करीत त्याला उत्तम साथ दिली. कर्नाटकने २० षटकांत २ बाद २१५ धावा फटकावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

PMP Route : ‘पीएमपी’चे मार्ग, फेऱ्या वाढणार; मार्गांची पुनर्रचना लवकरच

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कायम, तुमच्या जिल्ह्यात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीकविमा; उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर; शेतकऱ्यांना २१०० कोटी मिळण्याची आशा

SCROLL FOR NEXT