t20 world cup pakistan team sakal
क्रीडा

T20 World Cup आधी पाकिस्तानला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू खेळला नाही तर टीम इंडियासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup Pakistan Team : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक सुरुवात होणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी जवळपास सर्वच देशांनी संघ जाहीर केले आहेत, मात्र पाकिस्तानने अद्याप टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ निवडलेला नाही. याआधी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. वृत्तानुसार संघाचा स्फोटक फलंदाज फखर जमान टी-20 विश्वचषक संघातून बाहेर गेला आहे. माजी फलंदाज राशिद लतीफने म्हटले आहे की, फखर जमानला दुखापत झाली आहे. त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग होणार नाही.

पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक मोठे अपडेट देताना, म्हणाला की फखर जमान टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही. जर फखर जमान टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला नाही तर टीम इंडियासाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल. फखरला गुडघ्याला दुखापत झाली असून तो चार ते सहा एक महिन्याच्या विश्रांतीवरही जाऊ शकतो. त्याची दुखापत शाहीन आफ्रिदीसारखीच आहे. तो लवकर बरा होईल अशी आशा आहे.

फखर जमान हा तोच फलंदाज आहे ज्याने 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला सर्वात मोठा धक्का दिला होता. 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, पाकिस्तानने फखर जमानच्या 114 धावांच्या जोरावर भारताला विजयासाठी 339 धावांचे लक्ष्य दिले होते. ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया अवघ्या 158 धावांत गारद झाला होता. 2017 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या या पराभवानंतर टीम इंडियाचे तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT