T20 World Cup Qualifier Karthik Meiyappan Hat - Trick  esakal
क्रीडा

SL vs UAE | VIDEO : कार्तिक मयप्पन चेन्नईतून पोहचला युएईत! केली लंकेविरूद्ध ऐतिहासिक 'हॅट्ट्रिक'

अनिरुद्ध संकपाळ

Karthik Meiyappan Hat - Trick : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात पात्रता फेरीचा सामना झाला. श्रीलंकेने हा सामना 79 धावांनी जिंकत आपले खाते उघडले. लंकेने 20 षटकात 8 बाद 152 धावा केल्या. तर युएईचा डाव 17.1 षटकात 73 धावांवर संपुष्टात आला. जरी युएईने सामना हरला असला तरी त्यांचा गोलंदाज कार्तिक मयप्पनने ऐतिहासिक कामगिरी केली.

कार्तिक मयप्पनने 15 व्या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट घेत हॅट्ट्रिक साधली. या हॅट्ट्रिकच्या जोरावर त्याने इतिहास रचला. टी 20 वर्ल्डकपमध्ये युएईकडून हॅट्ट्रिक घेणारा तो क्रिकेट इतिहासातला पहिला गोलंदाज ठरला. मय्यपनने 15 व्या षटकात चौथ्या चेंडूवर राजपक्षाला बाद केले. यानंतर आलेला चरिथ असलंका देखील झेलबाद झाला. मय्यपनने आपल्या 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शनकाचा त्रिफला उडवत आपली ऐतिहासिक हॅट्ट्रिक पूर्ण केली.

मय्यपन आता पुरूषांच्या वर्ल्डकपमध्ये एखाद्या कसोटी संघाविरूद्ध हॅट्ट्रिक घेणारा असोसिएट संघातला पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. टी 20 वर्ल्डकप इतिहासात आतापर्यंत पाच खेळाडूंनी हॅट्ट्रिक साधली आहे. ब्रेट ली (2007), कर्टिस कॅम्पहेर (2021), वानिंदू हसरंगा( 2021), कसिगो रबाडा (2021) आणि कार्तिक मयप्पन (2022).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT