icc predicts india playing xi for the match against pakistan 
क्रीडा

IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध ICC ने निवडली टीम इंडियाची प्लेइंग-11, स्टार खेळाडू बाहेर

आयसीसीने या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup IND vs PAK : टी-20 विश्वचषक 2022 आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मेगा स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहे. आयसीसीने सर्व संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारतीय संघ पाहिला तर आयसीसीने या प्लेइंग इलेव्हनमध्ये रविचंद्रन अश्विन आणि ऋषभ पंत यांचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह समावेश केलेला नाही.

अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल या दोन फिरकी गोलंदाजांना खेळवले आहे. आयसीसीने या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

आयसीसीने निवडलेल्या भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचं झालं तर, रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. आयसीसीने सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर ठेवले असून त्याच्यानंतर हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकला स्थान दिले आहे. भारताचा हा फलंदाजी क्रम जवळपास निश्चित होता.

जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आपले गोलंदाजी आक्रमण कसे करतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल हे दोन फिरकीपटू आयसीसीच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. तर त्यांनी भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांचा वेगवान आक्रमणात समावेश केला आहे. येथे आयसीसीने मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे.

आयसीसीने निवडलेली भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT