T20 World Cup Team India  sakal
क्रीडा

T20 World Cup : टीम इंडिया 'या' दिवशी होणार रवाना, BCCI करणार 4 खेळाडूंचा खर्च

मोहम्मद शमीसह स्टँडबाय खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाणार खर्च मात्र BCCI करणार

Kiran Mahanavar

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपला आता फारच कमी दिवस बाकी आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताने आपला संघ जाहीर केला आहे. आता मिशन वर्ल्ड कपची तयारीही जोरात सुरू केली आहे. टीम इंडियाला अजून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 ऑक्टोबरला टी-20 मालिका संपल्यावर टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी रवाना होणार आहे. T20 विश्वचषक संघात समाविष्ट केलेले खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिका खेळणार नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियात लवकर जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियासोबत स्टँड बाय खेळाडूही ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. ज्यामध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश आहे.

आयसीसी टूर्नामेंटमध्ये, संघातील 15 खेळाडू चा प्रवास आयसीसीकडूनच असतो. म्हणजेच स्टँडबाय मधील चार खेळाडूंना बीसीसीआयला स्वखर्चाने न्यावे लागेल आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही स्वत:च करावी लागेल. संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला उर्वरित संघासह स्टँडबाय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवण्यास सांगितले आहे. जेणेकरून सराव सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूला काही समस्या आल्यास, स्टँडबाय खेळाडूला तात्काळ संघाशी जोडता येईल.

टीम इंडियाने याआधी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, त्यावेळी संघाचे अर्धा डझनहून अधिक खेळाडू जखमी झाले होते. ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टँडबाय खेळाडूंचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ (India squads T20 World Cup 2022) -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT