t20 world cup team india sakal
क्रीडा

T20 WC : वरुण राजा कोणाला पावणार; पाऊस पाकिस्तानला सेमी फायनल मध्ये नेणार?

टीम इंडियासाठी पाऊस 'व्हिलन'! ...असं झालं तर पाकिस्तान उपांत्य फेरीत

Kiran Mahanavar

T-20 World Cup Points Table Group-2 : टी-20 विश्वचषकात मध्ये रोहित शर्माची आज सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. भारत आणि बांगलादेश अॅडलेडवर आमने-सामने असणार आहेत. मात्र या सामन्यात पाऊस त्रास देऊ शकतो. अॅडलेडमध्ये मंगळवारी खुप पाऊस झाला होता आणि बुधवारीही ढगाळ वातावरण आहे. भारताची या स्पर्धेत चांगली सुरुवात झाली. भारताने आधी पाकिस्तान नंतर नेदरलँड्सविरुद्ध विजयाची नोंद केली, पण अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 5 विकेट्सने पराभव झाला. त्याचे 3 सामन्यांत 4 गुण आहेत.

भारताचा आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेशी असणार आहे. या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मेलबर्नमध्ये पावसामुळे सुपर-12 चे अनेक सामने रद्द करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर मोठा धोका असु शकतो.

सुपर-12 च्या ग्रुप-2 मध्ये भारताचा रन रेट सध्या 0.844 आहे. तर पाकिस्तानचा स्कोअर 0.765 आहे. पाकिस्तानचे 3 सामन्यांत 2 गुण झाले असून तो गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि भारताला 2 सामन्यांत 2 पेक्षा जास्त गुण मिळू नयेत अशी प्रार्थना करावी लागेल. त्याला 3 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी तर 6 नोव्हेंबरला बांगलादेशशी सामना करायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT