Manika Batra sakal
क्रीडा

Manika Batra : मनिकाची उपांत्य फेरीत धडक

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेमध्ये रोमहर्षक विजय

सकाळ वृत्तसेवा

बँकॉक : भारताच्या चौथ्या मानांकित मनिका बत्रा हिने शुक्रवारी भारतासाठी संस्मरणीय कामगिरी केली. तिने आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या चेन झू यू हिच्यावर ४-३ असा रोमहर्षक विजय मिळवत आशियाई टेबल टेनिस करंडकातील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये पोहोचणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.

मनिका हिला या स्पर्धेसाठी चौथे मानांकन देण्यात आले आहे. तसेच चेन हिला तिसरे मानांकन देण्यात आले होते. मनिकाने ही लढत ६-११, ११-६, ११-५, ११-७, ८-११, ९-११, ११-९ अशी जिंकली आणि पुढे वाटचाल केली. मनिकासमोर उपांत्य फेरीच्या लढतीत जपानच्या मिमा इटोचे आव्हान असणार आहे. मिमा इटो हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोरियाच्या जिऑन जिही हिच्यावर सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिमा इटो हिने ही लढत ११-८, ११-५, १२-१०, १५-१३ अशी सहज जिंकली.

मनिकाने याआधीच्या अंतिम १६ फेरीतील लढतीत जागतिक क्रमांकात सातव्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन झिंगटोंग हिला पराभूत करीत पुढे पाऊल टाकले. मनिकाने चेनचे कडवे आव्हान ४-३ असे परतवून लावले. मनिकाने या लढतीत ८-११, ११-९, ११-६, ११-६, ९-११, ८-११, ११-९ असा विजय साकारला.

स्पर्धेचे स्वरूप खडतर

यंदाच्या आशियाई टेबल टेनिस करंडकाचे स्वरूप खडतर आहे. आशियाई खंडातील सर्वोत्तम १६ खेळाडूंना या स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच पहिल्यांदाच थेट बाद फेरीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी सुमार खेळ झाल्यास त्या खेळाडूचे आव्हान तिथेच संपुष्टात येत आहे. शरथ कमल व जी. साथियन यांना पुरुषांच्या एकेरीत पुढे जाण्याची संधी मिळालेली नाही.

पुरुषांच्या गटातील आव्हान संपुष्टात

आशियाई स्पर्धेमध्ये महिला गटात मनिका बत्राच्या रूपात भारताकडून एकमेव आव्हान शिल्लक आहे. पुरुष गटात शरथ कमल व जी. साथियन या दोघांनी स्पर्धेची पात्रता मिळवली होती. दोघांचेही आव्हान अंतिम १६ फेरीमध्ये संपुष्टात आले आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी नाव जाहीर झालेल्या शरथ याला आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. चीन तैपईच्या च्वॉंग चिह य्वान याने शरथवर ७-११, ११-४, ११-७, ११-४, ११-६ असा विजय मिळवला आणि पुढे पाऊल टाकले. जपानच्या युकीया उडा याने साथियनची कडवी झुंज ११-९, ११-८, ७-११, ९-११, ११-६, १०-१२, ११-६ अशी मोडून काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT