team india beat australia in delhi test-1-in-test-ranking-after-odi-t20 ind vs aus rohit sharma cricket news in marathi  sakal
क्रीडा

IND vs AUS: कांगारूकडून 3 दिवसात हिसकावले बादशाहत! ODI-T20 नंतर भारत कसोटीतही नंबर-1

Kiran Mahanavar

India vs Australia Test : नागपूरपाठोपाठ भारताने दिल्ली कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. नागपूरप्रमाणेच टीम इंडियाने दिल्ली कसोटीही अवघ्या 3 दिवसांत जिंकली. यासह भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्गही जवळपास मोकळा झाला आहे.

आयसीसी क्रमवारीत दिल्ली कसोटी जिंकल्याचा फायदाही टीम इंडियाला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाला खाली ढकलून भारत आता सर्वोत्तम कसोटी संघ बनला आहे. कसोटी क्रमवारीत भारत आता नंबर-1 बनला आहे. दिल्ली कसोटी जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात 121 गुण आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 120 गुण आहेत. वनडे आणि टी-20 मध्ये टीम इंडिया आधीच नंबर 1 टीम आहे. वनडेतही ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर टी-20 मध्ये भारतानंतर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाकडून 3 दिवसात हिसकावले बादशाहत

दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकाचा कसोटी संघ म्हणून उतरला होता. पण अवघ्या तीन दिवसांनी भारताने त्यांचे बादशाहत संपवले. या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचे 126 रेटिंग गुण होते. त्याचवेळी टीम इंडियाच्या खात्यात 115 गुण होते, पण दिल्ली जिंकल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

यापूर्वी आयसीसीकडून कसोटी क्रमवारीत गोंधळ झाला होता. 4 दिवसांपूर्वी आयसीसीच्या वेबसाईटवर भारताला कसोटीत नंबर 1 संघ म्हणून घोषित करण्यात आले होते. पण यानंतर काही वेळातच भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आला. त्यानंतर आयसीसीने याबाबत माफी मागितली.

एवढेच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणेही भारताचे जवळपास निश्चित झाले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया 66.67 टक्के गुणांसह अव्वल, तर भारत 64.06 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT