Hardik Pandya Wife Natasha  sakal
क्रीडा

Hardik Pandya Wife Natasha : तुझ्या वाचून करमेना! पांड्या ऑस्ट्रेलियाला जाताच रमला बायकोच्या आठवणीत

हार्दिकला येऊ लागली त्याची पत्नी नताशाची आठवण

Kiran Mahanavar

Hardik Pandya Wife Natasha : भारतीय क्रिकेट संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपल्या टी-20 विश्वचषक मिशनसाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. टीम इंडियाला विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. याआधी भारतीय संघ 4 सराव सामने खेळणार आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचाही विश्वचषकासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान हार्दिकला त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिचची आठवण येऊ लागली आहे.

हार्दिकने इन्स्टाग्राम स्टोरीवर पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पत्नीसोबतचा फोटो शेअर करताना हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मिस यू'. या कॅप्शनसह पांड्याने हार्ट इमोजीही बनवला आहे. हा फोटो आधी हार्दिकची पत्नी नताशानेही इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मोठी गोष्ट मिसिंग आहे. नताशाने यासोबत आणखी दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हार्दिक त्याचा मुलगा अगस्त्यला मिठी मारताना दिसत आहे.

हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्या आणि त्याची वहिनी पंखुरी शर्मा यांनीही नताशाच्या फोटोवर कमेंट केली आहे. हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियासाठी पहिला सराव सामना खेळत आहे. हार्दिक पांड्याने त्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तो सराव सामन्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. हार्दिक हा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असून तो मधल्या फळीत संघाची ताकद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT