Team India
Team India 
क्रीडा

Team India: राजकारणामुळे आणखी एका खेळाडूचं करियर कुजवलं? अवघ्या 27 व्या वर्षी कारकीर्द संपली

Kiran Mahanavar

Team India : भारतीय संघाने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. ज्यात तिसरा आणि अंतिम सामना पावसामुळे वाया गेला. यामुळे मालिका 1-0 ने न्यूझीलंडने जिंकली. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामनाही पावसामुळे रद्द करावा लागला होता. टीम इंडियाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात चांगली फलंदाजी करत आली नाही. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघ 47.3 षटकात 219 धावांवर ऑलआऊट झाला. दरम्यान, असाच एक खेळाडू संघासोबत राहिला जो राजकारणामुळे खेळू शकला नाही.

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संपूर्ण वनडे मालिकेत बेंचवर बसला होता. कानपूरचा राहणारा कुलदीप संघासोबत गेला पण त्याला कोणत्याही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. हॅगली ओव्हल मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शिखर धवनने प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत फिरकीपटू म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत कुलदीप यादवला एकही सामना न खेळता मायदेशी परतावे लागले.

कुलदीप यादवने या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने 18 धावांत 4 बळी घेतले पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी-2022 मध्ये यूपी संघाचा भाग आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत आता पुढील संधीसाठी त्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित आहे.

कुलदीप आता 27 वर्षांचा आहे. 2017 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या चायनामन स्पिनरने आतापर्यंत 7 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 26, एकदिवसीय सामन्यात 118 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एकूण 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 126 विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर कुलदीपने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांच्या जोरावर 34 सामन्यांमध्ये 874 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT