Team-India 
क्रीडा

"हे विसरू नका की याच टीम इंडियाने...", हुसेनचा इंग्लंडला इशारा

विराज भागवत

वाचा, काय म्हणाला इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन

Ind vs Eng Test: दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने (Team India) तिसऱ्या कसोटी सामन्यात अतिशय खराब कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ७८ धावांत संपला. त्यानंतर इंग्लंडने (England) दमदार फलंदाजी (Batting) करत ४३२ धावा कुटल्या आणि भारतावर ३५४ धावांची आघाडी (Lead) घेतली. या आघाडीचा पाठलाग करताना भारताचा संघ २७८ धावांवर बाद झाला. त्यामुळे एक डाव व ७६ धावांनी सामना गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवली. पण असं असलं तरीही इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने विराट अँड कंपनीबद्दल एक महत्त्वाचे विधान केले.

"हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडू स्विंग करून भारतीय फलंदाजांना हैराण केलं. भारताचे गोलंदाज प्रतिभावान असले तरी त्यांना त्या परिस्थितीचा तितका वापर करून घेता आला नाही. आता इंग्लंडने मालिकेत १-१ची बरोबरी घेतली असली तरी इंग्लंडने आराम करता कामा नये. आता इंग्लंडने कामाला लागायला हवं आणि पुढच्या दोन्ही सामन्यात तशीच कामगिरी करून मालिका जिंकायला हवी", असा सल्ला हुसेनने दिला.

"उर्वरित दोन सामन्यांसाठी ज्या खेळपट्ट्या आहेत त्या दोन्ही खेळपट्ट्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या अशाच आहेत. त्यामुळे भारताला जास्त संधी देऊ नका. कारण इंग्लंडच्या संघाला हे विसरून चालणार नाही की ही तीच टीम इंडिया आहे जी ३६ धावांवर ऑलआऊट झाली होती आणि त्यानंतर पुढे ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. त्यातही महत्त्वाचे म्हणजे भारताने तो विजय विराट कोहली नसताना मिळवला होता", असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT