World Cup 2003 Team India 
क्रीडा

किस्सा वर्ल्ड कपचा : एक-दोन नाही तर चक्क ७ कर्णधारांसह टीम इंडिया उतरली होती वर्ल्डकप मध्ये...

Kiran Mahanavar

World Cup 2023 Team India : भारतात खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप 2023 साठी बीसीसीआयने आपल्या संघाची घोषणा केली आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. संघात समतोल साधण्यावर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी भर दिला आहे.

कागदावर भारतीय संघ समतोल दिसत आहे. तरीही प्रतिस्पर्धी संघातील डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा बघून एक तरी ऑफ स्पिनर संघात ठेवायला हवा होता असे काहींचे म्हणणे आहे. पण संघात एक नव्हे ते सात कर्णधार हा किस्सा दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 2003 वर्ल्ड कप मधला आहे.

2003 वर्ल्ड कपमध्ये त्या वेळेचा भारतीय कर्णधार सौरभ गांगुली आणि प्रशिक्षक जॉन राईट यांनी संघ बांधणी करताना एक कल्पना काढली. संघातील सर्व खेळाडूंचा योजना आखण्यात सकारात्मक सहभाग असावा या विचाराने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाड्यांवर गुणात्मक सुधारणा करायला प्रत्येक आघाडीवर दोन खेळाडूंची निवड केली.

फलंदाजीसाठी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड, गोलंदाजीसाठी जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे, तर क्षेत्ररक्षणासाठी कैफ-युवराज अशा जोड्यांची निवड केली. संघात या खेळाडूंना त्या-त्या क्षेत्रात कर्णधार मानले गेले.

वर्ल्ड कपवर याचा परिणाम असा झाला की, संघात सौरभ गांगुलीसह एकूण सात कर्णधार झाले. प्रत्येक आघाडीवरचे कर्णधार आपापल्या क्षेत्रात संघाने प्रगती करावी म्हणून काम करू लागले.

जबाबदारीसोबत अधिकार दिल्याने प्रत्येकाचा सहभाग वाढला. संघात लक्षणीय बदल जाणवू लागला. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना भारतीय संघाने दिमाखात जिंकला आणि भारतीय संघाच्या कामगिरीला लय सापडली. मग समोर आलेल्या प्रत्येक संघाला पराभूत करायचा भारतीय संघाने जणू धडाका लावला. एका संघात सात कर्णधार नेमण्याची विलक्षण योजना भलतीच यशस्वी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या रणधुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT