Prithvi Shaw County Cricket  esakal
क्रीडा

Prithvi Shaw : 'लोक तेव्हाच हात वर करतात जेव्हा आपण...', संघातून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी शॉ झाला भावुक

Kiran Mahanavar

Prithvi Shaw Post Instagram Story : टीम इंडियाचा डॅशिंग फलंदाज पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून संघातून बाहेर आहे. BCCIच्या निवड समितीकडून सातत्याने दुर्लक्ष झाल्यावर त्याने इंग्लंडकडून रॉयल लंडन वन डे चषकात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण तिथे 2 शतके ठोकल्यानंतर त्याला दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून बाहेर जावे लागले. डरहमविरुद्धच्या सामन्यात शॉला दुखापत झाली होती. आता दुखापतीनंतर त्याने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून एक मेसेज लिहिला आहे.

इंस्टा स्टोरी पोस्ट करताना पृथ्वी शॉने लिहिले की, 'जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाता तेव्हा लोक तुम्हाला मदत करतात. पण लोक तेव्हाच हात वर करतात जेव्हा आपल्या आयुष्यात उतरायची सुरुवात होते. मात्र, शॉने अशी स्टोरी का लावली हे कळले नाही. अशा स्टोरी पोस्ट करून तो अनेकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो.

काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सोशल मीडियावर शॉसाठी पोस्ट केले होते. पृथ्वी शॉसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, “माझ्या मित्रा निरोगी राहा. तू लवकर बरा व्हा, अशी माझी इच्छा आहे. अर्जुनने पोस्टमध्ये शॉसोबतचा लहानपणीचा फोटोही टाकला होता. ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल झाली होती.

पृथ्वी शॉने रॉयल लंडन वर्ल्ड कपमध्ये 4 डावात 143 च्या सरासरीने एकूण 429 धावा केल्या. ज्यामध्ये 2 शतकांचाही समावेश होता. डरहमविरुद्धचा सामना खेळताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला.

शॉने टीम इंडियासाठी 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी-20 सामन्यात 339, 189 आणि 0 धावा केल्या आहेत. शॉ भारताकडून आतापर्यंत फक्त 1 टी-20 खेळू शकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT