WI vs IND Team India  esakal
क्रीडा

WI vs IND Team India : तिकीटाचा गोंधळ! अमेरिका, लंडन अन् नेदरलँड करत भारतीय संघ अखेर पोहचला विंडीजमध्ये

अनिरुद्ध संकपाळ

WI vs IND Team India : येत्या 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी, वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ आज (दि. 30) वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. मात्र तिकीटांचा गोंधळ झाल्याने भारतीय संघ वेगवेगळ्या बॅचमध्ये कॅरेबियन बेटावर दाखल झाले. बीसीसीआयला गुरूवारी एकाच विमानाची सर्व तिकीटे मिळाली नाहीत. त्यामुळे संघाला बॅचेसमध्ये अमेरिका, लंडन, नेदरलँड करत विंडीज गाठावे लागले.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे पॅरिस आणि लंडमधून वेस्ट इंडीजला रवाना होणार आहेत. हे दोघे कधी पोहचतील हे अजून स्पष्ट नाही. रोहित आणि विराट सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार हे दोघे वेस्ट इंडीजमध्ये पुढच्या आठवड्यात दाखल होतील.

विंडीज दौऱ्यावर भारतीय संघ पहिल्यांदा दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेद्वारेच भारतीय संघाचे WTC 2023 - 25 चे सर्कल सुरू होईल. भारताने आपला शेवटचा कसोटी सामना हा WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला होता. तर वेस्ट इंडीजने आपला शेवटचा कसोटी सामना हा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला होता.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. त्यातील 22 सामने भारताने तर 30 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. हे दोन संघ 2019 मध्ये शेवटची कसोटी मालिका खेळले होते. भारताने त्यावेळी विंडीजला 2 - 0 असा व्हाईट वॉश दिला होता. यावेळी देखील भारतीय संघाचे पारडे जड आहे.

मात्र गेल्यावेळेच्या तुलनेत भारतीय वेगवान गोलंदाजी नवखी आहे. भारतीय संघात आता मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उनाडकट, नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

भारतीय कसोटी संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैसवाल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरला! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT