bcci official confirms Rohit Sharma Virat Kohli Will Not Be Part Of India T20I Squad  sakal
क्रीडा

Team India : BCCI घेणार मोठा निर्णय! विराट कोहली, रोहितला देणार डच्चू?

सकाळ वृत्तसेवा

Team India : भारतीय क्रिकेट संघाला 2013 पासून आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी स्पर्धा जिंकता आलेली नाही. बीसीसीआयकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. भारतामध्ये या वर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या विश्‍वकरंडकानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंची चर्चा करून त्यांना क्रिकेटच्या एका प्रकारामधून निवृत्त होण्यास सांगण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमधून हे वृत्त समोर आले आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या यादीत विराट कोहली व रोहित शर्मा या दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, भारतातील एकदिवसीय विश्‍वकरंडक आटोपल्यानंतर टी-२० क्रिकेटकडे लक्ष देण्यात येणार आहे. २००७ नंतर भारताने एकदाही टी-२० विश्‍वकरंडक पटकावलेला नाही. भारतातील आयपीएल स्पर्धेत युवा खेळाडू चमकत असतात. त्यानंतरही भारताला टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. ही बाब खटकणारी आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय निवड समिती योजना आखणार असून त्याची अंमलबजावणी एकदिवसीय विश्‍वकरंडकानंतर करण्यात येईल, असे ही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

हे खेळाडू रडारवर

भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू रडारवर असणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, रवीचंद्रन अश्‍विन, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वरकुमार व के.एल.राहुल या खेळाडूंशी निवड समिती संवाद साधण्याची शक्यता आहे. विराट कोहलीची शारिरीक तंदुरुस्ती पाहता त्याला टी-२० क्रिकेटसाठी आणखी एक संधी देण्यात येऊ शकते.

२०२४ विश्‍वकरंडकासाठी संघ तयार करणे

निवड समितीकडून भारतातील एकदिवसीय विश्‍वकरंडकासाठी (२०२३) २० खेळाडूंची संभाव्य निवड करण्यात आली होती. आता निवड समितीला २०२४मध्ये वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकासाठी संभाव्य खेळाडूंची निवड करावयाची आहे. जेणेकरून स्पर्धा नजीक येईपर्यंत टीम इंडियाची संघ बांधणी झालेली असेल. यशस्वी जयस्वाल, ॠतुराज गायकवाड, रिंकू सिंग, रवी बिश्‍नोई यांसारख्या खेळाडूंना भारताच्या टी-२० संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT