IND vs AUS sakal
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाला 'या' खेळाडूला न घेणं पडलं महागात; बसला मोठा फटका

टीम इंडियाला 'ती' एक चुक महागात पडली का?

Kiran Mahanavar

India vs Australia 1st T20: टी-20 वर्ल्ड कप 2022 ची तयारी पाहता टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मालिकेची सुरुवात खूपच खराब झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात अनुभवी खेळाडूला न घालणे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले आहे. या खेळाडूने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत, परंतु कर्णधार रोहित शर्माने या खेळाडूला पहिल्या टी-20 साठी प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केला नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण खराब गोलंदाजी होते. या सामन्यात कर्णधार रोहितने अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांचा फिरकीपटू म्हणून समावेश केला होता. तर अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला डावलले. आर अश्विन प्रत्येक स्थितीत गोलंदाजी करण्यात माहिर आहे. तरीही त्याला संघात घेतले नाही.

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग असणार आहे. नुकतेच त्याने टीम मध्ये पुनरागमन केले आहे, आता तो या स्पर्धेत संघाचा महत्त्वाचा एक भाग बनला आहे. आर अश्विन आशिया कपमध्येही खेळला आहे. टीम इंडियाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या दौऱ्यावर आर अश्विनने टी-20 संघात पुनरागमन केले. अश्विनने टीम इंडियासाठी 56 टी-20 सामन्यात 66 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांचा कर्णधार रोहित आर अश्विनला संधी दिल्यास तो संघासाठी मोठा सामना विजेता ठरू शकतो.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियन संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा करून सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT