Tilak Varma Asia Cup Team India Squad esakal
क्रीडा

Tilak Varma Asia Cup 2023 : तिलक, केएल अन् अय्यर... बीसीसीआयने घेतलीय मोठी रिस्क

अनिरुद्ध संकपाळ

Tilak Varma Asia Cup Team India Squad : बीसीसीआयने 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2023 साठी आपला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला. भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या संघाकडे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकप संघ म्हणून देखील पाहिले जात आहे. मात्र हा संघ निवडताना बीसीसीआयने मोठी रिस्क घेतली आहे. त्यांनी तीन खेळाडूंवर एक प्रकारे जुगारच खेळला आहे.

तिलक वर्मा

भारताकडून अवघे 7 वनडे सामने खेळलेला तिलक वर्मा हा थेट आशिया कपमध्ये वनडे पदार्पण करणार आहे. त्याने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो सध्या आयर्लंडमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळत आहे.

वेस्ट इंडीजमध्ये त्याने 5 सामन्यात 50 पेक्षा जास्तच्या सरासरीने 173 धावा केल्या आहेत. मात्र वनडे क्रिकेटमध्ये त्याने अजून पदार्पण केलेले नाही. अशा परिस्थितीत वर्ल्डकपची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशिया कपसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. तिलक थेट मोठ्या स्पर्धेत पदार्पण करणार असल्याने इथे तो हिरो म्हणून देखील चमकू शकतो किंवा त्याची कारकिर्द देखील संपू शकते.

केएल राहुल

भारताचा अनुभवी फलंदाज आणि एकेकाळचा उपकर्णधार केएल राहुल जवळपास सहा महिन्यांनी भारतीय संघात परतत आहे. तो जरी पूर्णपणे फिट झाला असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात येत असलं तरी नवडसमिती अध्यक्ष अजित आगरकरने त्याला एक दुसरी दुखापत झाल्याने तो पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र तरी देखील राहुलला संघात ठेवण्यात आले आहे. तो स्पर्धा सुरू असताना फिट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचा बॅकअप प्लॅन म्हणून संजू सॅमसनला स्टँड बायमध्ये ठेवण्यात आले आहे.

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर देखील बॅक फ्रॅक्चरच्या दुखापतीने त्रस्त होता. त्याने आपल्या दुखऱ्या पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. तो एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत होता. या दुखापतीमुळे तो आयपीएल 2023 ला देखील मुकला होता. श्रेयस अय्यर फिट झाला आहे की नाही याची घोषणा बीसीसीआयने स्पष्टपणे केली नव्हती. मात्र त्याला आशिया कपमध्ये स्थान देत बीसीसीआयने मोठी रिस्क तर घेतली नाही ना असा प्रश्न उपस्थिती होतो.

त्याला बुमराहप्रमाणे आयर्लंड दौऱ्यावर आपला मॅच फिटनेस चाचपण्याची संधी देखील मिळालेली नाही. तो थेट आशिया कपमध्ये खेळणार आहे. जर या मालिकेत अय्यरला पुन्हा दुखापत झाली तर भारतासाठो तो मोठा धक्का असेल. कारण वर्ल्डकपसाठी पुन्हा बीसीसीआयला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची शोधाशोध करावी लागेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT