Ruturaj Gaikwad Hardik Pandya  esakal
क्रीडा

Ruturaj Gaikwad : भारतीय संघ नक्कीच.. ऋतुराजच्या खेळीने डोळे उघडलेल्या हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Ruturaj Gaikwad Hardik Pandya : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात 50 चेंडूत 92 धावा ठोकल्या. ऋतुराजने आयपीएल 2023 ची दणक्यात सुरूवात केली. विशेष म्हणजे भारतीय टी 20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर त्याने चौकार षटकारांची बरसात केली. ऋतुराज गायकवाडने हार्दिक पांड्याला आपली क्षमतचा दाखवून दिली.

दरम्यान, भारतीय टी 20 संघात ऋतुराजचा समावेश असतो. मात्र त्याला आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवण्याची विशेष संधी मिळालेली नाही. गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलवर पांड्याने जास्त विश्वास दाखवला असून त्याला टी 20 मध्ये सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळत आहे.

आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 92 धावांची खेळी केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली. धोनीला आपला मेंटॉर मानणाऱ्या हार्दिक पांड्याने देखील ऋतुराजबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहे.

हार्दिक पांड्या म्हणतो की, 'जर ऋतुराज अशाच प्रकारे फलंदाजी करत राहिला तर तो भारतीय क्रिकेटमध्येच असाच धुमाकूळ घालत राहिला तर त्याला नक्की संधी मिळेल. ज्यावेळी त्याची वेळ येईल त्यावेळी भारतीय संघ नक्की त्याच्या पाठीशी उभा राहील याची मला खात्री आहे.' हार्दिकच्या वक्तव्यावरून ऋतुराजला असून त्याच्या संधीची वाट पहावी लागणार आहे असे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT