rishabh pant t20 world cup  sakal
क्रीडा

Rrishabh Pant : T20 वर्ल्ड कपपूर्वी पंत चिंताग्रस्त, केला मोठा खुलासा

टीम इंडिया या टी-20 विश्वचषक 2021 मध्ये जेतेपद पटकावण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता, मात्र खराब कामगिरीमुळे पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले.

Kiran Mahanavar

Team India T-20 World Cup : भारतीय क्रिकेट संघासाठी टी-20 विश्वचषक 2021 खूप वाईट राहिला होता. टीम इंडिया या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता, मात्र खराब कामगिरीमुळे पहिल्याच फेरीत बाहेर पडावे लागले. इतकंच नाही तर वर्ल्डकपसारख्या मंचावर पहिल्यांदाच पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियात कर्णधार रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे, पण त्याआधी संघ थोडा चिंताग्रस्त आहे. याबाबत ऋषभ पंत खुलासा केला आहे.

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की, या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी संघ थोडा चिंताग्रस्त आहे. या वर्षी 22 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. भारत गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधून बाद झाला होता. आता विश्वचषक जवळ आला आहे, संपूर्ण संघ थोडा घाबरलेला आहे, परंतु त्याच वेळी एक संघ म्हणून आम्हाला आमचे 100 टक्के देणे आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे आवडते. हे फक्त आपणच करू शकतो.

भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. गेल्या वेळी भारत टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतच बाद झाला होता. पंत म्हणाला, आशा आहे की यावेळी आम्ही अंतिम फेरीत पोहोचू आणि संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करू. ऑस्ट्रेलियात आम्हाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो, त्यामुळे आपण जिंकू शकतो.

ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियात 2020-21 मधील ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच आत्मविश्वासाने जवळपास दोन वर्षांनंतर पंत पुन्हा एकदा भारताला T20 विश्वचषक जिंकून देण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियन भूमीवर उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT