Team India World Cup Squad 2022  sakal
क्रीडा

T20 World Cup 2022 : टीम इंडियाची अंतिम 11 खेळाडूंचा शोध कधी संपणार ?

भारतीय संघ तयारीने सज्ज झालाय की अजून 11 जणांच्या योग्य संघनिवडीचा शोध चालू आहे, हा प्रश्न अधांतरी तरंगतो आहे.

सुनंदन लेले

T20 World Cup 2022 : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेअगोदर भारतीय संघ यंदा भरपूर सामने खेळला आहे. आता ऑस्ट्रेलियात आल्यावर सराव सामन्यांचा धडाका चालू आहे. दोन सामने पर्थमध्ये खेळून झाल्यावर अजून दोन सामने ब्रिस्बेनला खेळून मगच भारतीय संघ मुख्य वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानसमोर खेळणार आहे. याचाच अर्थ असा, की तयारीला अगदी मुबलक संधी भारतीय संघाला देताना बीसीसीआयने सर्व ते प्रयत्न केले आहेत. भारतीय संघ तयारीने सज्ज झालाय की अजून 11 जणांच्या योग्य संघनिवडीचा शोध चालू आहे, हा प्रश्न अधांतरी तरंगतो आहे.

पर्थला सराव करून मग पश्चिम ऑस्ट्रेलिया संघासमोर भारतीय संघ दोन सराव सामने खेळला आहे. एका सामन्यात उत्तम कामगिरी करून विजय हाती लागला; तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्याने पराभव स्वीकारावा लागला. संघ व्यवस्थापन जय-पराजयाला महत्त्व नसून आम्ही खेळाडूंना स्थानिक वातावरणाशी जुळवून घ्यायला संधी देत असल्याचे सांगत असलो तरी वर्ल्डकप तोंडावर आला असताना संघाचे शोधकार्य शेवटपर्यंत चालूच असल्याचे लक्षण खूप आश्वासक वाटत नाही.

रिषभ पंतवर दोघांचाही विश्वास रिषभ पंतवर प्रशिक्षक आणि कप्तानाचा इतका विश्वास आहे, की संघात दोन यष्टिरक्षक खेळवण्याच्या विचारांचा संघ व्यवस्थापनाचा अट्टहास अजून डोके वर काढत आहे. रिषभ पंतची गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी अफलातून झाली होती. मोठे फटक्यांची त्याची क्षमताही अचाट आहे. सत्य इतकेच आहे, की रिषभ पंतने क्षमतेला न्याय देणारी अपेक्षित कामगिरी टी-२० प्रकारात केलेली नाही. इतकेच काय, त्याला सलामीला पाठवण्याचे प्रयोग यशस्वी ठरला नाही.

वर्ल्डकपमधील पहिल्या सामना जवळ येत असताना भारतीय संघाला ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. ब्रिस्बेनला होणारे दोन सराव सामने तगड्या संघाबरोबर असल्याने निर्णय प्रक्रिया अजून स्पष्ट करायला मदत होईल. के. एल. राहुलने सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने सलामीचा प्रश्न मिटला असून पाचव्या क्रमांकाचा फलंदाज कोण, नवीन चेंडू टाकणारा दुसरा गोलंदाज कोण, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याची उत्तरे शोधून २३ तारखेला मोठ्या सामन्याला भिडायचे आव्हान भारतीय संघाला पेलायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT