Team India’s Jersey Sakal
क्रीडा

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Team India’s Jersey: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. टीम इंडियाची युवासेना या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Team India’s Jersey for Zimbabwe Series: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाला आहे.

टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. जिथे टीम इंडियाचे खेळाडू पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी गेली आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे.

खरंतर, टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल कर्णधार असेल. याशिवाय या मालिकेतून अनेक खेळाडू टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतात, अशी अपेक्षा आहे. टीम इंडिया 8 वर्षांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. यादरम्यान भारतीय संघाच्या जर्सीत मोठी चूक दिसून आली आहे.

भारताच्या जर्सीत चूक?

टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध त्याच डिझाईनची जर्सी घालणार आहे जी त्यांनी विश्वचषकादरम्यान परिधान केली होती. युवा खेळाडूंच्या नवीन जर्सीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या जर्सीत मोठी चूक आहे. खरं तर, 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या नावावर आता दोन टी-20 वर्ल्ड कप आहेत.

अशा परिस्थितीत या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोवर दोन स्टार असायला हवेत, पण या जर्सीवर एकच स्टार आहे.

कुठे आणि कधी खेळला जाईल सामना?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी झाला. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना सुरु झाला होता. भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेतील पहिला टी-20 सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला. तुम्ही या सामन्याचे थेट प्रेक्षेपण SonyLIV ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकता.

पहिल्या अन् दुसऱ्या सामन्यासाठीचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, ध्रुव जुरेल (यष्ठीरक्षक), रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्ठीरक्षक) आणि हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, आता न्यायमूर्ती अजय गुप्ता यांच्याकडे नीट पेपरफुटीची सुनावणी

Maharashtra Flood Relief: महाराष्ट्राला केंद्राकडून ५०० कोटींच्या 'मदतीचा हात', आगाऊ निधीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध सोलापुरात अदखलपात्र गुन्हा दाखल, काय आहे कारण?

Maharashtra Anti Conversion Law: सक्तीच्या धर्मांतराला राज्यात चाप! कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; ६० दिवसांची पूर्वसूचना आवश्‍यक

Maharashtra Rain: राज्याला दिलासा! अवघ्या ८ दिवसांत १५२ टीएमसी पाण्याची भर; राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT