thailand open indias kiran george stuns chinas weng hong yang in straight games enters quarter finals lakshya sen sakal
क्रीडा

Thailand Open : ऑल इंग्लंड विजेत्यावर लक्ष्य सेनचा शानदार विजय

आजच्या आणखी एका महत्वाच्या सामन्यात लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड विजेत्या ली शी फेंगला २१-१७, २१-१५ असा पराभवाचा धक्का दिला

सकाळ वृत्तसेवा

बँकॉक : थायंलड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत किरण जॉर्ज भारतीयांचा किल्ला लढवत आहे. जागतिक क्रमवारीत २६ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या वेंग हाँग यांगचा सलग गेमध्ये पराभव करून या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आजच्या आणखी एका महत्वाच्या सामन्यात लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड विजेत्या ली शी फेंगला २१-१७, २१-१५ असा पराभवाचा धक्का दिला.

किरणचे जागतिक क्रमवारीतील मानांकन ५९ वे आहे. आजच्या सामन्यात विजयासाठी त्याला ३९ मिनिटे पुरेशी ठरली. त्याने आपल्यापेक्षा सरस असलेल्या चीनच्या या खेळाडूविरुद्ध २१-११, २१-१९ असा विजय मिळवला.

सुपर ५०० असा दर्जा असलेल्या स्पर्धेत किरण प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. किरणने पहिल्या गेमध्ये एकतर्फी विजय मिळवला. चीनचा वेंग हाँगही कसलेला खेळाडू असल्यामुळे दुसऱ्या गेममध्ये त्याचा प्रतिकार अपेक्षित होता, या गेममध्ये चुरस झाली. अखेर मिळालेली आघाडी किरणने हातची जाऊ दिली नाही.

एकीकडे किरण आगेकूच करत असताना भारताच्या २३ वर्षीय असमिता छालिहाचे आव्हान संपुष्टात आले. माजी ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिना मरिनने अश्मितावर २१-१८, २१-१३ अशी मात केली.

महिला एकेरीत साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले हे बिंग जिओ हिने साईनावर २१-११, २१-१४ अशी मात केली. पुरुष दुहेरीत सात्विकराज आणि चिराग शेट्टी यांचाही तीन गेमनंतर पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाची रिपरिप, हवामान विभागाचा अंदाज

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT