Prafull Billore 
क्रीडा

T20 World Cup: 'तुझं योगदान देश लक्षात ठेवेल'; दक्षिण आफ्रिकेच्या टीमला सपोर्ट करणाऱ्या MBA चायवाल्याचं का होतंय कौतुक?

MBA chaiwala Prafull Billore: अनेकांना प्रश्न पडू शकतो की, विरोधी संघाला सपोर्ट करून देखील त्याचं कौतुक का होतंय? याचं उत्तर एकदम खास आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाच्या या काम़गिरीवर संपूर्ण भारतवासी खूष आहेत. याच दरम्यान, भारतीय संघाऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सपोर्ट करणाऱ्या MBA चायवाल्याचं क्रिकेटप्रेमी कौतुक करत आहेत. अनेकांना प्रश्न पडू शकतो की, विरोधी संघाला सपोर्ट करून देखील त्याचं कौतुक का होतंय? याचं उत्तर एकदम खास आहे.

MBA चायवाला म्हणजे प्रफुल्ल बिल्लोरे ज्या कोणत्या संघाला सपोर्ट करतो तो संघ हरतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यामुळेच लोकांनी त्याला पनौती म्हणण्यास सुरुवात केली. याचमुळे प्रफुल्लने यावेळी अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट करण्याचं ठरवलं होतं. त्यामागे भारताचा विजय व्हावा असा प्रामाणिक हेतू होता. योगायोगाने दक्षिण आफ्रिकेचा संघ हरलाय. त्यामुळेच त्याचे कौतुक होत आहे.

प्रफुल्लने एखाद्या संघाला सपोर्ट केले किंवा एखाद्या खेळाडूसोबत फोटो टाकला तर त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडतं असा नेटकऱ्यांचा समज झालेला आहे. सूर्यकुमार यादवसोबत प्रफुल्लने फोटो टाकले होते. तेव्हापासून सूर्या फ्लॉप जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रफुल्ल याला ट्रोल केले जात होते. पनौती म्हणून त्याला हिणवलं जातं होतं.

प्रफुल्ल बिल्लोरेने म्हणूनच दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून दक्षिण आफ्रिकेसाठी तो पनौती ठरेल आणि भारतीय संघाचा विजय होईल. आणि योगायोग तसंच झालं आहे. त्यानंतर प्रफुल्लने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने पनौती लिहिलेला टी-शर्ट घातलेलं दिसत आहे. यावेळी तो भावुक झाल्याचं दिसत आहे.

प्रफुल्ल बिल्लोरे उर्फ MBA चायवाला याच्याबद्दल लोकांमध्ये त्यामुळे प्रेम निर्माण झालं आहे. अनेकांनी त्याचे दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत. तुझे योगदान देश लक्षात ठेवेल अशा प्रकारची प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. त्यामुळे पनौती ठरलेला प्रफुल्ल सध्या कौतुकास पात्र ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT