Paris Olympics  sakal
क्रीडा

Paris Olympics : टेबल टेनिस संघाने इतिहास रचला ; पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र

भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने सोमवारी इतिहास रचला. दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवली. आता हे दोन्ही संघ पॅरिस ऑलिंपिकमधील सांघिक विभागात पहिल्यांदा सहभागी होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने सोमवारी इतिहास रचला. दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवली. आता हे दोन्ही संघ पॅरिस ऑलिंपिकमधील सांघिक विभागात पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. २००८ पासून ऑलिंपिकमध्ये एकेरीसह सांघिक विभागासाठीही स्पर्धा घेतल्या जात आहेत. पण २००८, २०१२, २०१६ व २०२१ या ऑलिंपिकमध्ये भारताच्या एकाही संघाला पात्रता मिळवता आली नव्हती. यंदा मात्र जागतिक क्रमवारीच्या जोरावर भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट बुक केले.

बुसान येथे मागील महिन्यात जागतिक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पॅरिस ऑलिंपिकसाठी ही अखेरची पात्रता फेरी होती. या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला होता. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेकडून सोमवारी पात्र ठरलेल्या देशांबाबत माहिती देण्यात आली आहे.

क्रमवारीनुसार ही निवड करण्यात आली आहे. भारताच्या दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताचा पुरुषांचा संघ १५ व्या स्थानावर आहे. भारतासह पुरुष विभागात क्रोएशिया (१२ वे स्थान), स्लोवेनिया (११ वे स्थान) या देशांनीही पात्रता मिळवली आहे. भारतीय महिला संघ १३ व्या स्थानावर असून या विभागात भारतासह पोलंड (१२ वे स्थान), स्वीडन (१५ वे स्थान) व थायलंड या देशांना पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवता आला आहे.

चार ऑलिंपिकनंतर...

२००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिस या खेळातील सांघिक विभागातील स्पर्धांना सुरुवात झाली. तिथपासून २०१२ लंडन, २०१६ रिओ दी जेनेरियो व २०२० टोकियो अशा एकूण चार ऑलिंपिक पार पडल्या. पण भारताच्या पुरुष व महिला यापैकी कुणालाही सांघिक विभागात पात्र ठरता आले नाही.

स्पेशल भावना : शरथ कमल

भारताच्या दोन्ही संघांनी पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवल्यानंतर भारताचा अनुभवी पुरुष खेळाडू शरथ कमल याने आनंद व्यक्त केला. तसेच ट्विटर या सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, अखेर ऑलिंपिकमध्ये सांघिक विभागासाठी पात्र ठरलो. पाचव्या प्रयत्नात आम्हाला यश मिळाले. त्यामुळे साहजिकच आनंद मोठा आहे. याची प्रतीक्षा बराच काळ करीत होतो. त्यामुळे स्पेशल भावना मनामध्ये निर्माण झाल्या आहेत. महिला संघानेही पात्र ठरून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT