National Kabaddi Tournament sakal
क्रीडा

National Kabaddi Tournament : नगरमधील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राची सलामी गुजरातशी

येथील वाडिया पार्कवर उद्यापासून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. फॉर्मात असलेल्या नव्या खेळाडूंमुळे यंदा महाराष्ट्र संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्राचा संघ गतउपविजेता असून उद्या होणाऱ्या सलामीच्या सामन्यात गुजरातचा संघ प्रतिस्पर्धी असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नगर : येथील वाडिया पार्कवर उद्यापासून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. फॉर्मात असलेल्या नव्या खेळाडूंमुळे यंदा महाराष्ट्र संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्राचा संघ गतउपविजेता असून उद्या होणाऱ्या सलामीच्या सामन्यात गुजरातचा संघ प्रतिस्पर्धी असणार आहे.

भारतीय कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने नगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाची आठ गटांत विभागणी करण्यात येणार असून महाराष्ट्राचा ब गटात समावेश असेल.

प्रत्येक गटातून दाेन संघ असे एकूण १६ संघ बाद फेरी गाठतील. बाद फेरीच्या सामन्यापासून खऱ्या अर्थाने स्पर्धेत चुरस पाहावयास मिळेल. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मॅटच्या चार क्रीडांगणावर एकाच वेळी सामने पाहावयास मिळतील.

सामने सायंकाळच्या सत्रात विद्युत झोतात खेळविण्यात येतील. तीस हजार क्रीडारसिकांना स्पर्धेचा आनंद लुटता यावा, याकरिता प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. बुधवारपर्यंत २२ संघाचे आगमन नगरमध्ये झाले असून आठ संघ येण्याच्या मार्गावर आहेत. स्पर्धेतील सामने वेळेवर सुरू करून वेळेत संपविण्याचा आयोजकांचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT