Paris Olympics sakal
क्रीडा

Paris Olympics : रशिया, बेलारुसचे खेळाडू ‘दर्शकच’ ;' पॅरिस ऑलिंपिक उद्‌घाटन सोहळ्यात स्थान नसणार

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत रशिया आणि बेलारुसचे खेळाडू पॅरिसमध्ये असतील, परंतु त्यांना ऑलिंपिकमधील उद्‌घाटनाच्या पारंपरिक परेडमध्ये प्रवेश नसेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने जाहीर केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जीनिव्हा : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत रशिया आणि बेलारुसचे खेळाडू पॅरिसमध्ये असतील, परंतु त्यांना ऑलिंपिकमधील उद्‌घाटनाच्या पारंपरिक परेडमध्ये प्रवेश नसेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने जाहीर केले आहे.

येत्या २६ जुलै रोजी होणारा पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा आगळावेगळा आणि परंपरेला छेद देणारा असणार आहे. सर्व खेळाडू अनेक किलोमीटर दूरवरून सीन नदीतून प्रवास करत आयफेल टॉवरकडे येणार आहेत. या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याची मान्यता मिळालेले रशिया आणि बेलारूसमधील खेळाडू या सोहळ्यात भाग घेणार नाहीत, तर ते नदीच्या तीरावर राहून हा सोहळा पाहू शकतील. ही ऑलिंपिक स्पर्धा संपल्यानंतर २६ ऑगस्टपासून याच पॅरिसमध्ये पॅरालिंपिक स्पर्धा होणार आहे. रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंसाठी आयओएचा हाच निर्णय कायम असणार आहे.

युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धेतील सांघिक स्पर्धा शर्यतीतून बंदी घालण्यात आली आहे; मात्र त्यांचे खेळाडू तटस्थ म्हणून वैयक्तिक प्रकारात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे, परंतु या खेळाडूंना प्रथम त्यांच्या त्यांच्या क्रीडा संघटनेकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे आणि त्यानंतर या खेळाडूंना आयओसी नियुक्त रिव्ह्यू पॅनेल मान्यता देईल.

रशिया आणि बेलारूसमधील जे खेळाडू वैयक्तिक स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरतील ते खेळाडू सैन्यदलातील किंवा सुरक्षा एजन्सीमधील कर्मचारी नसावेत अशीही प्रमुख अट तयार करण्यात आली आहे; मात्र रशिया मिलिट्री स्पोर्ट क्लबमधील खेळाडू सहभागासाठी पात्र आहेत की नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत रशियाचा पासपोर्ट असलेले ३६ आणि बेलारूसचा पासपोर्ट असलेले २२ खेळाडू तटस्थ खेळाडू म्हणून खेळण्याची शक्यता आयओसीने व्यक्त केली. या सर्वांना उद्धघाटन सोहळ्यात तर प्रवेश नसेलच, परंतु ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारोप सोहळ्यातील त्यांच्या प्रवेशाबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असे आयओएने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land deal: मुंढवा जमीन गैर व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लिन चीट, दोषी कोण? अहवालात काय म्हटलं?

नेवासे तालुका हादरला! 'सदस्यांच्या छळाला कंटाळून पदाधिकाऱ्याने जीवन संपवले'; शिक्षण संस्थेच्या सहा सदस्यांवर गुन्हा, चिठ्ठीत काय दडलयं?

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT