Umesh Yadav 
क्रीडा

Umesh Yadav: आयपीएलवरच माझी कारकीर्द ठरणार! खुद्द उमेश यादवने दिले निवृत्तीचे संकेत?

खुद्द उमेश यादवने दिले निवृत्तीचे संकेत?

धनश्री ओतारी

आयपीएलला सुरुवात होण्यासाठी काही तासच राहिले आहेत. दरम्यान, वेगवान गोलंदाज उमेश यादवने टीम इंडियाला धक्का दिला आहे. निवृत्ती घेणार असल्याचे सूचक वक्तव्य यादवने केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ माजली आहे. (This Can Be My Last World Cup Umesh Yadav ODI world cup )

आज तकला दिलेल्या मुलाखतीत उमेश यादव बोलत होता. माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरु आहे. वर्ल्ड कप चार वर्षातून एकदा येतो. कदाचित हा माझा अखेरचा वर्ल्ड कप असेल. त्यामुळे आयपीएलमध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी देण्याचा माझा प्रयत्न असेल. असं सूचक वक्तव्य यादवने केल आहे.

तसेच, मला आयपीएलमध्ये संधी मिळेल आणि आणखी चार वर्षे वाट पाहण्याऐवजी मला यावेळी भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळेल, अशी आशा करतो. असही उमेश यादव यावेळी म्हणाला.

उमेश यादवने 2011 मध्ये टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केले होते. भारतीय भूमीवर 100 बळी घेणाऱ्या मोजक्या भारतीय गोलंदाजांपैकी तो एक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो एकदिवसीय संघातून बाहेर आहे. उमेशचा इंडियाच्या अनेक विजयात मोलाचा वाटा उचलला.

उमेश यादवने टीम इंडियासाठी 56 टेस्टमध्ये 168 विकेट घेतल्या आहेत. त्याने 75 एकदिवसीय सामन्यांमध्ये 106 विकेट घेतल्या आहेत. तर 9 टी-20 मध्ये या गोलंदाजाने 12 विकेट घेतल्या आहेत. उमेश यादवने आयपीएलमध्ये आतापर्यंत 133 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 135 फलंदाजांना बाद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT