Deepti-Sharma-India 
क्रीडा

INDvSA : ३ षटकं, शून्य धावा, ३ बळी; दीप्तीने केली कमाल!

वृत्तसंस्था

सुरत : 'ती आली, तिनं पाहिलं अन् तिनं जिंकलं' असंच काहीसं तिच्याबाबतीत म्हणावं लागेल. तीन निर्धाव षटकं अन् त्याच्या मोबदल्यात घेतल्या तीन विकेट. ती आहे महिला क्रिकेट संघातील ऑल राउंडर प्लेअर दीप्ती शर्मा.

भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 11 धावांनी विजय मिळवला. आणि पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. भारताची ऑल राउंडर खेळाडू दीप्ती शर्माने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चीत केलं. दीप्तीने तीन षटके टाकताना 3 बळी मिळविले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने ही तीनही षटके निर्धाव टाकली. 

18 balls, 18 dots & 3 wickets.@Deepti_Sharma06 on an absolute roll in Surat. @Paytm #INDWvSAW

Details - https://t.co/QFRNkBAGt9 pic.twitter.com/q1w20ULMkv

— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2019

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळत आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय खेळाडूंना म्हणावी अशी सुरवात करता आली नाही. कारकीर्दीतील पहिला सामना खेळणाऱ्या शेफाली वर्माला भोपळाही फोडता आला नाही. मराठमोळ्या स्मृती मंधानाने जेमायमा रॉड्रीग्जला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीदेखील 21 धावा काढून बाद झाली. 

यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली. एकीकडून भारतीय खेळाडू बाद होत असताना हरमनने दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत ठेवला होता. 34 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या बळावर तिने 43 धावांची खेळी केली. मात्र, तिला अर्धशतक साजरे करता आले नाही. छोट्या-छोट्या भागीदारी करत तिने आफ्रिकेसमोर 20 षटकांत 130 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभारले. 

WATCH: @Deepti_Sharma06 ’s match-winning spell of 3/8

Three straight maiden overs and three wickets from the all-rounder as she spun a web around the SA batters. @Paytm #INDWvsSAW

LINK - https://t.co/xZKHvuoXcf pic.twitter.com/dWZG2LYkQx

— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2019

सामना सहज जिंकता येईल, अशा अॅटिट्यूडमध्ये मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या महिला खेळाडूंनी सावध सुरवात केली. मात्र, दीप्तीने आपल्या गोलंदाजीची हुकमी हत्यारे बाहेर काढत आफ्रिकेच्या फलंदाजीचे सगळे मनसुबे धुळीस मिळविले. शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 2-2 बळी मिळवत दीप्तीला चांगली साथ दिली. तर कर्णधार हरमनने एक बळी मिळवत विजय साजरा केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT