Indian cricketer Tilak Varma celebrating a historic T20 milestone surpassing Virat Kohli and Shubman Gill.

 

esakal

क्रीडा

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

Tilak Varma surpasses Virat and Shubman : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याच्या नावावर या कामगिरीची नोंद झाली.

Mayur Ratnaparkhe

Tilak Varma Creates a New T20 Milestone : टीम इंडियाचा रायसिंग स्टार अन् युवा फलंदाज तिलक वर्मा याने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याने  टी-२० कारकिर्दीत चार हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याच्या नावावर या कामगिरीची नोंद झाली.

खरंतर या सामन्यात त्याने ३४ चेंडूत २५ धावा काढल्या मात्र, तरीही  टीम इंडियाने सात गडी राखून हा सामना जिंकला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावा करण्याचाबाबत त्याने विराट आणि शुभमन यांना मागे टाकले आहे.

तसं पाहिलं तर टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करण्याच्या विक्रम ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर आहे. त्याने ११६ डावांमध्ये ही कामगिरी केली बजावलेली आहे. यानंतर या यादीत केएल राहुलचा क्रमांक लागतो, त्याने ११७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आता तिलक वर्मा आला आहे, त्याने १२५ डावांमध्ये ४००० टी-२० धावा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय, शुभमनने १२९ डावांमध्ये आणि विराट कोहलीने १३८ डावांमध्ये चार हजार धावांचा टप्पा टी-२०मध्ये ओलांडलेला आहे.

तिलक वर्माने आतापर्यंत भारतासाठी पाच एकदिवसीय आणि ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकदिवसीय सामन्यात ६८ धावा आणि टी-२० मध्ये १११० धावा केल्या आहेत. तर त्याचे अद्याप कसोटीत पदार्पण झालेले नाही. तिलकने १२५ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ४३.२१ च्या सरासरीने ४०१९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २३ अर्धशतके आणि चार शतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

Satara Accident : शिरवळ–लोणंद रस्त्यावर भीषण अपघात; वीर धरणाजवळ दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, सात गंभीर!

Sheetal Tejwani Arrest : शीतल तेजवानीची रवानगी येरवडा कारागृहात; ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत मौन!

SCROLL FOR NEXT