WI vs IND India's T20I squad  esakal
क्रीडा

WI vs IND India's T20I squad : तिलक वर्मा, यशस्वी जैसवालला लागली टी 20 ची लॉटरी; रिंकू सिंहकडे केलं दुर्लक्ष

अनिरुद्ध संकपाळ

WI vs IND India's T20I squad : वेस्ट इंडीज दौऱ्यावरील टी 20 मालिकेसाठी भारतीय टी 20 संघाची घोषणा आज करण्यात आली. या संघात आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैसवाल आणि तिलक वर्मा यांची निवड झाली असून त्यांना या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मात्र केकेआरचा फिनिशन रिंकू सिंहकडे निवडसमितीने दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे.

बीसीसीआयने अजित आगरकरची निवडसमिती अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर लगेचच भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीच्या टी 20 संघाची घोषणा झाली. भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा नेहमीप्रमाणे समावेश नाहीये. संघाच्या नेतृत्वाची धुरा ही हार्दिक पांड्याच्या खांद्यावरच आहे. तर उपकर्णधार पदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघात आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून धावांचा पाऊस पाडणारा तिलक वर्मा तर राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैसवालची वर्णी लागली आहे. मात्र चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला टी 20 संघात संधी मिळालेली नाही. याचबरोबर केकेआरचा मॅच फिनिशर रिंकू सिंह याचा या संघात समावेश होईल अशी आशा होता. मात्र त्याला संधी मिळालेली नाही.

याचबरोबर गोलंदाजी विभागात उमरान मलिक आणि आवेश खान यांनी संघात पुनरागमन केले आहे. याचोबरोबर मुकेश कुमारची देखील संघात वर्णी लागली आहे. तर फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रवी शास्त्री यांना संधी मिळाली आहे. तर रविंद्र जडेजाला संघात स्थान मिळालेले नाही. बहुदा त्याला टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारताचा टी 20 संघ :

इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT