esakal
क्रीडा

सिंगापूरचा टिम डेव्हिड खेळणार ऑस्ट्रेलियाकडून, कॅप्टन फिंचची घोषणा

ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांमधील कर्णधार आरोन फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठी घोषणा केली आहे.

धनश्री ओतारी

ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांमधील कर्णधार आरोन फिंचने ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठी घोषणा केली आहे. सिंगापूरचा एक खेळाडून कांगारुंच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत फिंचने दिले आहेत.

इंग्लंडमधील आणखी एका धमाकेदार कामगिरीनंतर फिंचने मोठा फटका मारणारा फलंदाज टिम डेव्हिड विश्वचषकातील आपल्या योजनांमध्ये असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी टीम डेव्हिड आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. परंतु आता तो इंग्लंडमध्ये T20 लीग खेळत आहे.

टिम डेविडने सिंगापूरकडून १४ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळलं आहेत. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट अद्याप खेळलेल नाही. त्याने ओल्ड ट्रॅफर्डमध्ये केवळ २५ चेंडूवर चार चौकार आणि चार षटकार ६० धावा केल्या. त्याने लंकाशायरसाठी टी २० लीगमध्ये कमालीची कामगिरी केली.

आगामी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्याला या संघात घेतलेल नाही. मात्र, फिंच यांनी सोमवारी त्याला लवकरच संघात स्थान देणार असल्याची कबुली दिली आहे.

यंदा घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा बचाव करताना अॅरॉन फिंच म्हणाला, टीम डेव्हिडसाठी गणिते सुरू आहेत. तो म्हणाला, "होय मला वाटतं. तो गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलचे शेवटचे सामने त्याच्यासाठी खूप चांगले होते. तो मजबूत लयीत दिसला. पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करण्याची क्षमता हे अत्यंत दुर्मिळ कौशल्य आहे आणि त्याने ते केले. अनेक वेळा केले आहे." अशा शब्दात त्याने टीमचे कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT