Paine_Smith file photo
क्रीडा

कॅप्टन्सीच्या दुखण्यावरील 'पेन किलर' स्मिथला दिलासा देणारी

स्मिथ आता पुन्हा संघात परतला असला तरी तो एक खेळाडू म्हणून खेळत आहे. संधी मिळाल्यास ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा स्मिथने मार्चमध्ये व्यक्त केली होती.

वृत्तसंस्था

स्मिथ आता पुन्हा संघात परतला असला तरी तो एक खेळाडू म्हणून खेळत आहे. संधी मिळाल्यास ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा स्मिथने मार्चमध्ये व्यक्त केली होती.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने कर्णधारपदासाठी स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) पाठिंबा दर्शविला आहे. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) सामन्यात बॉल टेम्परिंग प्रकरणी दोषी आढळल्याने स्मिथवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. तसेच त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याजागी टिम पेनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. (Tim Paine support Steve smith to lead Australia again)

टिम पेनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत २-१ने हरवले होते. त्यामुळे टिम पेनच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. याच दरम्यान स्मिथला पुन्हा कर्णधार बनविले जावे, अशी जोरदार चर्चा सुरू होती.

आता स्मिथ पुन्हा संघात परतला असला तरी तो एक खेळाडू म्हणून खेळत आहे. संधी मिळाल्यास ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा स्मिथने मार्चमध्ये व्यक्त केली होती. सध्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाची धुरा सांभाळणाऱ्या पेनने स्मिथला कर्णधार पद मिळावे, या मुद्द्याचे समर्थन केले आहे.

फॉक्स क्रिकेटने दिलेल्या वृत्तानुसार, स्मिथकडे दुसऱ्यांदा कर्णधारपद सोपवावे का? असा प्रश्न विचारल्यानंतर पेन म्हणाला होता की, स्मिथ हा हुशार खेळाडू आहे. त्यामुळे त्याला आणखी एक संधी मिळाली पाहिजे. हा निर्णय माझ्या हातात नाहीय, पण यशस्वी कर्णधार म्हणून स्मिथची ओळख आहे. तो चतुर रणनीतीकार आहे.

केपटाउनमधील घटनेदरम्यान एक कर्णधार म्हणून स्मिथ परिपक्व होत होता. जेव्हा मी कर्णधार म्हणून कारकीर्दीला सुरवात केली होती, तिच अवस्था त्यावेळी स्मिथची होती. खूप कमी वयात त्याच्याकडे इतकी मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घटनेनंतर त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. पण स्मिथला पुन्हा कर्णधारपद मिळावे, यासाठी मी त्याचे नक्की समर्थन करीन, असे पेन म्हणाला.

टिम पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २३ कसोटी सामने खेळले. त्यापैकी ११ सामन्यात विजय मिळाला, तर ९ वेळा त्याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे स्मिथने ३४ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले असून १८ वेळा विजय मिळविला आहे. कर्णधार असताना स्मिथने ६० डावांमध्ये ७०.३६च्या सरासरीने ३६५९ धावा केल्या आहेत. तसेच १५ शतके झळकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT