Sourav Ganguly  
क्रीडा

Sourav Ganguly : दादाला BJP मध्ये न जाणं भोवलं? BCCI मधून मिळाला डच्चू; TMC कडून हल्लाबोल

शहा पुत्राला दुसरी टर्म मग गांगुलीला का नाही?

Kiran Mahanavar

Sourav Ganguly : कपिलदेव यांच्या विश्वविजेत्या संघातील अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट मंडळाचे (BCCI) नवे अध्यक्ष असणार हे निश्चित झाले आहे. त्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला. बीसीसीआय प्रशासनातील नव्या टीमची जुळवाजुळव झाली. येत्या 18 तारखेला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपासून नवी कार्यकारिणी कार्यभार स्वीकारेल.

सौरव गांगुली पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार नाहीत. त्यामुळे नव्या अध्यक्षांचा शोध काही दिवस अगोदरपासून सुरू होता. रॉजर बिन्नी यांचेच नाव चर्चेत होते. अखेर काही बैठकानंतर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. गांगुलीचा बोर्ड अध्यक्षपदाचा प्रवास आता संपणार आहे, सौरवने 2019 मध्ये हे पद स्वीकारले होते.

रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची जागा घेणार असल्याच्या वृत्तादरम्यान म्हटले जात आहे. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) मंगळवारी भारतीय जनता पक्षावर (BJP) हल्लाबोल केला आहे. माजी भारतीय क्रिकेट कर्णधाराचा "अपमान करण्याचा प्रयत्न" केल्याचा त्यानी आरोप केला.

तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, भाजपने गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गांगुली पक्षात सामील होणार आहेत. टीएमसी खासदार डॉ. शंतनू सेन म्हणाले की हे राजकीय सूडबुद्धीचे उदाहरण आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शाह दुसऱ्यांदा बीसीसीआय सचिव म्हणून काम करू शकतो. परंतु गांगुली अध्यक्ष म्हणून करू शकत नाही. गांगुली कोलकाता येथील असून भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून का? आम्ही गांगुलीच्या पाठीशी असल्याचे शंतनूने सांगितले. भाजपने मात्र हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे आणि प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या गांगुली यांना पक्षात घेण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही.

अमित शाह यांचा संदर्भ देत तृणमूलचे राज्य सरचिटणीस म्हणाले की, 'भाजपचा एक मोठा नेता' या वर्षी मे महिन्यात गांगुलीच्या घरी जेवणासाठी गेला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले 'भाजपने सौरव गांगुलीचा पक्षात कधी समावेश करण्याचा प्रयत्न केला. सौरव गांगुली हा दिग्गज क्रिकेटपटू आहे. बीसीसीआयमधील बदलावर आता काही लोक मगरीचे अश्रू ढाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

Uttrakhand : पंतप्रधान मोदीचा उत्तराखंड दौरा; आपत्तीग्रस्तांसाठी जाहीर केली १२०० कोटींची मदत

Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज

SCROLL FOR NEXT