Atanu Das And Deepika Kumari ESakal
क्रीडा

नवरा-बायकोची सिंगल्समध्ये कमाल, भारताला पदकाची आस

ऑलिम्पियन गोल्ड मेडलिस्ट विरुद्ध मॅच खेळणाऱ्या अतनू दासला पत्नी दीपिकाने दिलं प्रोत्सा

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020: फ्रान्सच्या पॅरिसमध्ये झालेल्या वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणाऱ्या नवरा-बायकोच्या जोडीनं ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ही जोडी ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळताना दिसेल असे वाटत होते. पण भारतीय तिरंदाजी संघात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव ही जोडी मिश्र सांघिक प्रकारात मैदानात उतरली होती. अनुभवी दीपिका आणि युवा प्रविणने सुरुवात चांगली केली. पण त्यांना फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. (tokyo olympics 2020 Archery Deepika Kumari cheers for husband Atanu Das as he beats Olympic gold medallist)

तिरंदाजीतील अखेरची आस आता पुरुष आणि महिला गटातील सिंगल्समधून आहे. अतनू दासने गुरुवारी क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीये. त्याने दक्षिण कोरियाच्या लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या ओ जिन येकला 6-5 असे पराभूत केले. पुरुष गटात 31 तारखेला अतनू दास आता जपानच्या फुरुकावा तकाहारु याच्यासोबत भिडणार आहे. दुसरीकडे त्याची पत्नी दीपिका कुमारी शुक्रवारी क्वार्टर फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल. तिचा सामना ROC च्या पेरोवा कसेनियासोबत होणार आहे.

भारताच्या दृष्टीकोनातून या दोन्ही सामन्यांना खूपच महत्त्व आहे. आतापर्यंत भारताने केवळ एकच पदक मिळवले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई करत भारताचे खाते उघडले होते. त्यानंतर नेमबाजीत भारतीय खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा होती. पण 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या पदरी निराशाच पडली. तिरंदाजीतील पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील अपयशानंतर सिंगल्समध्ये नवरा-बायकोनी पदकाची आशा पल्लवित केल्यात.

बायकोनं अतनू दासला अंस दिले प्रोत्साहन

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो याचा प्रत्येय ऑलिम्पिक स्पर्धेत पाहायला मिळाला. ज्यावेळी 16 व्या राउंडमध्ये अतनू दास खेळत होता त्यावेळी त्याची पत्नी दीपिका कुमारी त्याला प्रोत्साहन देताना दिसली. त्याने अचूक वेध घेत पत्नीप्रमाणे पहिल्या आठमध्ये स्थानही पक्के केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT