Atanu Das AND Deepika Kumari
Atanu Das AND Deepika Kumari Twitter
क्रीडा

Olympics : सॉरी इंडिया! पराभवानंतर अतनू दासने मागितली माफी

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : तिरंदाजीतील (Archery Event) भारताची पदकाची आस (India Medal Hope) शनिवारी संपुष्टात आली. पुरुष गटातील पदकाची आशा पल्लवित करणाऱ्या अतनु दासला प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्याने देशाची आणि देशवासियांची माफी मागितली आहे. तिरंदाजीमध्ये अंतनुदासपूर्वी त्याची पत्नी दीपिका कुमाही हिने देखील पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. महिला गटात तिला पराभाचा सामना करावा लागला होता. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी अतनु दास आणि दीपिकाने सोनेरी कामगिरी करत ऑलिम्पिकच्या रंगणात पाउल ठेवले होते. सांघिक प्रकारात दोघे वेगवेगळे खेळले. यातही त्यांना पदकापर्यंत पोहचेल असा निशाणा साधता आला नाही. (Tokyo Olympics 2020 Atanu Das Says Sorry India After Loss Medal Hope)

या दोघांशिवाय तिरंदाजीत भारताचे नेतृत्व करणाऱ्या प्रविण जाधव आणि तरुणदीप रॉय यांना आता पदकाशिवायच मायदेशी परतावे लागणार आहे. पराभवानंतर अतनु दासने एक ट्विट केलंय. सॉरी इंडिया! या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिमानास्पद कामगिर करण्यात अपयशी ठरलो. स्पर्धेदरम्यान भारतवासियांकडून मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे. अशा भावना त्याने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

महिला वैयक्तिक गटात दीपिका कुमारीचा प्रवासही प्री-क्वार्टर फायनलमध्येच संपुष्टात आला होता. जपानच्या ताकाहारू फुरूकावा हिने दीपिकाला पराभूत केले होते. त्यापाठोपाठ अतनु दासच्या प्रवासालाही ब्रेक लागला. पुरुष वैयक्तिक गटात अतनुने दक्षिण कोरियाचा अव्वल तिरंदाज जीन येकचा पराभव केला होता. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदक मिळवणाऱ्या जीनलाही त्याने पराभूत केले होते.

मिश्र टीम इव्हेंटमध्ये आश्चर्यकारक बदल

मिक्सड डबलमधील इवेंटसाठी भारतीय तिरंदाजी महासंघाने दीपिका आणि प्रविण जाधव या जोडीला मैदानात उतरले होते. यापूर्वी मिक्सड डबलमध्ये दीपिका कुमारी आणि अतनु दास यांना पदकाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. पण रँकिंग फेरीतील सामन्यातील निकालानंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळणाऱ्या प्रविण जाधवने 31 वे स्थान तर अतनु दासने 35 वे स्थान मिळवल्यामुळे भारतीय तिरंदाजी महासंघाने दीपिका आणि प्रविण या जोडीला मिक्सड डबलमध्ये उतरवण्याच निर्णय घेतला होता. या जोडीलाही पराभवाचा सामना करावा लागला. अतनुसोबत खेळले असते तर निकाल वेगळा असता अशी भावना दीपिकानेही बोलून दाखवलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT