Tokyo Olympics 2020
Tokyo Olympics 2020 E Sakal
क्रीडा

Olympics Day 6 : तिघींनी गाजवला दिवस!

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 Day 6 live Updates :टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघाला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अ गटात ग्रेट ब्रिटनने भारतीय महिलांना मात दिली. तिरंदाजीत तरुणदीप रायने पुरुष वैयक्तिक गटातील स्पर्धेत 16 मध्ये प्रवेश केला. पण तो आगेकूच करण्यात अपयशी ठरला.

बॅडमिंटनच्या कोर्टवर सिंधूने नावाला साजेसा खेळ करत उप उपांत्यपूर्व फेरी गाठलीये. रोविंगमध्ये भारतीय रोवर अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह या जोडीचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला.

लाइटवेट पुरुष डबल स्कल्सच्या रेपेचेज सेमीफायनलमध्ये ते सहाव्या क्रमांकावर राहिले. महिला बॅडमिंटनमध्ये सिंधूची कामगिरी वगळता सारे प्रवासी घडीचे असेच काहीसे चित्र स्पर्धेतील सहाव्या दिवसात पाहायला मिळाले. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या दीपिका कुमारीने आगेकूच केली. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पूजा रानीने विजयी ठोसा मारत क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवलीये. सहावा दिवस खऱ्या गाजवला तो पीव्ही सिंधू, दीपिका कुमारी आणि पूजा रानी या तिघींनी.

तिरंदाजी : दीपिका कुमारीने पदकाच्या दिशेनं आणखी एक पाउल टाकले पुढे, अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडीज विरुद्धच्या लढतीत तिने 4-2 असा विजय नोंदवत पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

बॉक्सिंग : 75 किलो वजनी गटात अल्जेरियन बॉक्सर इंचराकला 5-0 असे नमवत पूजा रानीची क्वार्टरफायनलमध्ये धडक

तिरंदाजी : महिला एकेरीत दीपका कुमारीची दमदार कामगिरी सुरुय, वर्ल्ड नंबर वन तिरंदाज दीपिका कुमारीनेे भूतानच्या कर्माला मागे टाकत तिने रॉउंड ऑफ 16 मध्ये जागा पक्की केलीये.

तिरंदाजी : पुरुष एकेरीत राउंड ऑफ 16 मध्ये महाराष्ट्रातील साताऱ्याचा प्रवीण कुमार याचे आव्हान संपुष्टात आले.

महिला हॉकी : भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव; ग्रेट ब्रिटनने उडवला 4-1 असा धुव्वा

तिरंदाजी : पुरुष वैयक्तिक गटात भारतीय तिरंदाज तरुणदीप रॉय इस्त्रायलच्या इटाय शानीकडून 6-1 असे पराभूत.

रोविंग : अरुण लाल आणि अरुन सिंग मेडल रेसमधून आउट, पुरुष गटातील सेमी फायनलमध्ये लाइटवेट डबल स्लब प्रकारात 6:24.41 टायमिंगसह सहाव्या स्थानावर मानावे लागले समाधान

बॅडमिंटन : महिला एकेरीत पीव्ही सिंधूचा दिमाखदार विजय, क्वार्टरफायनलमध्ये केला प्रवेश

सेलिंग : केसी गणपती आणि वरुण ठक्कर जोडीनं 49 इआर रेस 2 मध्ये 18 व्या स्थानावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT