Neeraj Chopra
Neeraj Chopra  File Photo
क्रीडा

Olympics: गुड मॉर्निंग इंडिया; टोकियोत नीरजनं जागवली गोल्डची आस

सुशांत जाधव

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकत भारताच्या सुवर्ण पदकाची आस जागृत केलीये. बुधवारी क्वालीफिकेशन ग्रुप ए मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra सर्वाधिक लांब भाला फेकला. त्याच्या ग्रुपमध्ये एकूण 15 स्पर्धेक होते. यात तो टॉपर राहिला. भालाफेकमधील (Javelin throw)वर्ल्ड रेकॉर्ड 98.48 मीटर असून ऑलिम्पिक रेकॉर्ड 90.57 मीटर इतका आहे.

नीरजच्या ग्रुपमध्ये 28 वर्षीय जर्मनचा वेटर जॉन्स (Vetter Johannes) हा देखील होता. त्याचा वैयक्तिक रेकॉर्ड हा 89.89 इतका आहे. 2017 मध्ये त्याने जागतिक अ‍ॅथलिट चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने हा रेकॉर्ड केला होता. ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये सहभागी स्पर्धकांमधील सर्वोत्तम कामगिरी ही जर्मनी खेळाडूच्या नावे आहे. पण त्याला मागे टाकत नीरज चोप्राने ग्रुप ए मध्ये टॉपर राहिलाय. त्यामुळेच नीरजकडून भालाफेक प्रकारात सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भालाफेक क्रीडा प्रकारात ग्रुप बीमधून भारताचा शिवपाल सिंगही मैदानात उतरला होता. पण फायनलासाठी तो पात्र ठरलेला नाही. या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं 85.16 मीटर अंतर भाला फेकला. दोन्ही ग्रुपमधील आघाडीचे 12 जण फायनलसाठी पात्र ठरले आहेत. शिवपाल सिंग 76.40 मीटर भालाफेकत त्याच्या ग्रुपमध्या बाराव्या स्थानावर राहिला. दोन्ही ग्रुपमधील निकालानंतरही नीरज टॉपलाच होता. त्यामुळे ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताच्या खात्यात दुसरे सुवर्ण जमा होइल, अशी आशा पल्लवित झाली आहे. दोन्ही ग्रुपमधून फायनलसाठी पात्र ठरणाऱ्यांमध्ये बेस्ट कामगिरी करणारा नीरज चोप्रा फायनलमध्ये कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. 7 ऑगस्ट रोजी भालाफेक क्रीडा प्रकाराचा फायनल निकाल स्पष्ट होईल.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूने भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाचे खाते उघडले होते. त्यानंतर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. या दोन पदकासह बॉक्सिंगच्या रिंगमधूनही एक पदक पक्के झाले आहे. कुस्ती आणि हॉकीमधून काही पदकाची आस आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने कमावलेले रौप्य आणि कुस्तीमध्ये साक्षी मलिकचे कांस्य अशी दोनच पदक भारताच्या खात्यात जमा झाली होती. यंदाच्या स्पर्धेत 127 भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी घेतला होता. तिरंदाजी आणि नेमबाजीतील पदकाची आस संपुष्टात आल्यानंतर आता बॉक्सिंग, हॉकीसह भालाफेकमध्ये पदकाची आस निर्माण झालीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT