India vs Spain Twitter
क्रीडा

हॉकी इंडिया विरुद्ध स्पेनचा रडीचा डाव; पंचांनी दाखवला हिसका!

तिसऱ्या क्वार्टरमधील खेळात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 India beats Spain : रुपिंदर पाल सिंग आणि सीमरनजीत सिंग यांनी डागलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने स्पेनला 3-0 असे पराभूत केले. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे. सलामीच्या लढतीती भारतीय संघाने न्यूझीलंडला 3-2 असे पराभूत केले होते. त्यानंतर वर्ल्ड नंबर वन ऑस्ट्रेलियासमोर भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 7-1 अशा लाजिरवाण्या पराभवानंतर पुन्हा भारतीय संघ ट्रॅकवर आलाय. (Tokyo Olympics 2020 Rupinder Pal India register their second win, beat Spain 3-0 in men's Pool A hockey match)

पहिल्या क्वार्टरमध्ये सिमरनजीतने भाराताकडून पहिला गोल डागला. पहिल्या गोलमधून स्पेनचा संघ सावरण्याच्या आता भारताने अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने 15 व्या मिनिटाला दुसरा गोल डागला. पेनल्टी कॉर्नरचे रुपिंदर पाल सिंगने गोलमध्ये रुपांतरित केले. पहिल्या क्वार्टरमध्ये मिळालेली 2-0 अशी आघाडी भारतीय संघाने पहिल्या हाफपर्यंत कायम ठेवली.

स्पॅनिश खेळाडूला यलो कार्ड

तिसऱ्या क्वार्टरमधील खेळात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. सामन्यातील 36 व्या मिनिटाला स्पेनचा अतिरिक्त खेळाडू मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. 12 वा स्पॅनिश खेळाडू मैदानात आल्यानंतर पंचांनी आपल्या अधिकाराचा वापर करत Miguel Delas या स्पॅनिश खेळाडूला येलो कार्ड दाखवले. या क्वार्टरमधील अखेरच्य़ा क्षणी स्पेनच्या मिडफिल्डरला पिछाडी कमी करण्याची संधी होती. पण त्यांना संधीच सोनं करता आले नाही. 45 व्या मिनिटाला स्पॅनिश संघाने रिव्ह्यूच्या माध्यमातून पेनल्टी मिळवली. गोल करण्याचा त्यांचा मानस भारतीय संघाने उधळून लावला. 51 व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंगने सामन्यातील दुसरा आणि संघासाठी 3-0 अशी आघाडी मिळवून देणारा गोल डागला. या विजयासह भारतीय संघाने आपल्या खात्यात 6 गुणांची कमाई केली आहे. अ गटात भारतीय संघ पुढील सामन्यात आता अर्जेंटिना विरुद्ध भिडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT