neeraj chopra  
क्रीडा

डोळ्यातून अश्रू आले नाहीत, पण त्यावेळी मी खूप भावूक झालो होतो - नीरज चोप्रा

नीरज त्या दिवशी इतका आनंदी होता की, तो ते सुवर्णपदक उशीच्या बाजूला ठेवून झोपला.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: तमाम भारतीयांसाठी शनिवारचा दिवस खास होता. टोक्यो ऑलिंपिक (Tokyo olympics) स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून ज्याची वाट पाहिली जात होती, तो क्षण नीरज चोप्रामुळे (neeraj Chopra) भारतीयांना अनुभवता आला. सर्वांचाच उर अभिमानाने भरुन आला होता. अ‍ॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक (gold medal) जिंकून नीरज चोप्राने नवीन इतिहास रचला. नीरजचा टोक्योपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. नीरजला मागच्यावर्षी दुखापत (injury) झाली होती. कोरोना काळामुळे सरावाची समस्या होती. पण या सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन नीरजने शनिवारी भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

"चांगली कामगिरी करण्याचा माझ्यावर एक दबाव होता आणि चांगलं प्रदर्शन केलं पाहिजे, हे मी स्वत:ला बजावत होतो. आता सुवर्णपदक पटकावल्यामुळे ते ओझं माझ्या मनावरुन उतरलय" असे नीरजने सांगितले. "स्पर्धा सुरु असताना माझ्या मनात फार काही चालू नव्हतं. या क्षणासाठी मी खूप मेहनत केलीय, हाच विचार माझ्या मनात होता. माझे भालाफेकीवरच पूर्ण लक्ष होते" असे नीरजने सांगितले.

२००८ नंतर पहिल्यांदाच ऑलिंपिक पोडियमवर भारतीय राष्ट्रगीताची धुन वाजली. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. माझ्या आतमध्ये भावनांचा बांध फुटला होता, असे नीरजने सांगितलं. "पोडियमवर असताना माझ्या डोळ्यासमोरुन, तो सर्व प्रवास येऊन गेला. मला दुखापत झालेली, त्यावेळी माझ्या करीअरचे पुढे काय होणार? ते विचार अनेकदा माझ्या मनात यायचे. पण सुवर्णपदक मिळवल्यानंतर आता कुठलाही विचार नाहीय. देवाने जे काही दिलेय, ते चांगल्यासाठीच आहे" असे नीरज म्हणाला.

"मी पोडियमवर उभा होतो. राष्ट्रगीताची धुन वाजत होती. ते क्षण रोमांचित करणारे होते. माझ्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत. पण त्यावेळी मी खूप भावूक झालो होतो" असे नीरज म्हणाला. शनिवारच्या रात्री नीरजला व्यवस्थित झोप लागली नाही. नीरज त्या दिवशी इतका आनंदी होता की, तो ते सुवर्णपदक उशीच्या बाजूला ठेवून झोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT