Bajrang Punia  File Photo
क्रीडा

Olympics: बजरंगला कांस्यपदक; इनाम म्हणून काय-काय मिळालं पाहा

Olympics: बजरंगला कांस्यपदक; इनाम म्हणून काय-काय मिळालं पाहा बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये भारतासाठी मिळवलं ब्राँझ मेडल Tokyo Olympics Bronze Medal winner Bajrang Punia gets 2.5 Crores with Govt Job and much more see list vjb 91

विराज भागवत

बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये भारतासाठी मिळवलं ब्राँझ मेडल

Tokyo Olympics: टोक्यो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोव यांच्यात ब्राँझ पदकासाठी सामना झाला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या बजरंग पुनियाने दमदार खेळ करत ब्राँझ पदक पटकावले. त्याने 8-0 असा एकतर्फी विजय मिळवला. सुवर्णपदक मिळवण्याची इच्छा असलेला बजरंग उपांत्य फेरीत पराभूत झाला. पण अखेर त्याने ब्राँझ पदकाची कमाई केली. बजरंग पुनियावर कौतुकाचा वर्षाव तर झालाच पण त्यासोबत इनाम जाहीर झाला.

मूळचा हरयाणाचा असलेल्या बजरंग पुनियाने देशाचे नाव जगात उंचावले. त्यासोबत त्याने हरयाणाचेही नाव जगात पोहोचवले. त्यामुळे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बजरंगसाठी इनाम जाहीर केला. बजरंग पुनियाने अप्रितम खेळ केला. त्याच्यामुळे हरयाणाचे नाव सर्त्र पोहोचले. त्यामुळे राज्य सरकारच्या योजनेनुसार, हरयाणा सरकारकडून बजरंग पुनियाला २.५० कोटींचे बक्षीस दिलं जाईल. त्यासोबतच सरकारी नोकरी देण्यात येईल. आणि हरयाणातील जमीन ५०टक्के सूटीच्या भावात त्याला विकत घेता येईल. तसेच, बजरंगचे मूळ गाव असलेल्या झझर जिल्ह्यातील खुंदन गावी एक इनडोअर स्टेडियमदेखील बांधण्यात येईल, अशी घोषणा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली.

असा रंगला सामना

बजरंगने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मजबूत केली होती. प्रतिस्पर्ध्याला त्याने संधीच दिली नाही. बजरंगने दौलतला मॅचमध्ये आघाडी घेण्यापासून रोखलं. 8-0 असा एकतर्फी त्याने दौलतचा पराभव केला. बजरंग देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तसे असले तरी त्याने केलेला खेळ हा त्याला लौकिकाला साजेसाच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT