क्रीडा

ऑलिंपिक सहभागाचे स्वप्न 67 सेकंदांपुरतेच

सकाळ वृत्तसेवा

जगण्यासाठी गवत कापण्याचे, घर रंगवण्याचे काम करीत असताना ऑलिंपिकचे स्वप्न बघत होता, अखेर त्याला संधी मिळाली.

टोकियो, ता. २६ व्हेनेझुएलातील अंतर्गत संघर्ष, तसेच आर्थिक प्रश्नांना सामोरे जात त्याने शरणार्थी संघातून ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत प्रवेश मिळवला खरा, पण त्याचे ऑलिंपिक सहभागाचे स्वप्न केवळ ६७ सेकंदाच्या आव्हानापुरतेच राहिले. शरणार्थी संघात असलेला एल्ट्रीक सेल्ला मिडलवेट गटातील लढतीत डॉमिनिक रिपब्लिकच्या एउरी सेदेनो याच्यासमोर फार तर एक मिनीट टिकला.

सेदेनोच्या ताकदवान ठोशांनी एल्ट्रीक काही सेकंदातच खाली पडला. पहिल्या काऊंटबॅकला तो उबा राहिला, पण त्यानंतरचा ठोसा त्याच्या चेहऱ्यावरच लागला आणि पंचांनी लढत थांबवण्याचे ठरवले. एल्ट्रीक यास तयार नव्हता, पण पंच निर्णयावर ठाम राहिले.

एल्ट्रीकची कहाणी धक्कादायक आहे. १८ व्या वर्षी तो व्हेनेझुएला बॉक्सिंग संघात आला, पण आर्थिक विवंचनेमुळे त्याला खेळ सोडावा लागला. त्याने २०१८ मध्ये वडिलांसह त्रिनिदादमध्ये आश्रय घेतला. तिथेही त्याने बॉक्सिंगचे प्रेम जोपासण्यास सुरुवात केली.

एल्ट्रिक ऑलिंपिकचे स्वप्न बघत होता, पण शरणार्थी असल्यामुळे त्रिनिदाद संघात स्थान मिळणार नव्हते. जगण्यासाठी गवत कापण्याचे, घर रंगवण्याचे काम करीत असताना ऑलिंपिकचे स्वप्न बघत होता, अखेर त्याला संधी मिळाली. त्यासाठी अर्थात त्रिनिदाद सरकारची परवानगी मिळवण्यासाठी लढावे लागले. सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील स्पर्धेच्यावेळी असे सांगत त्याने अन्य प्रश्न टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT