U-19 WC Ind vs ENG 
क्रीडा

U-19 WC Ind vs ENG : काला चश्मा गाण्यावर थिरकल्या चॅम्पियन! पाहा ICC चा VIDEO

Kiran Mahanavar

U-19 WC Ind vs ENG : भारतीय संघ अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत चॅम्पियन बनला आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. विजयानंतर भारतीय संघाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. भारतीय खेळाडूंनी विजयानंतर 'काला चष्मा' गाण्यावर डान्स केला. त्याचा व्हिडिओ आयसीसीनेच शेअर केला आहे.

भारतीय अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्या आहेत. टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती आहे आणि भारताने तो जिंकून इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 68 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 14 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

सुपर-सिक्स टप्प्यातील ग्रुप-1 मधील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने सात गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा पहिला आणि एकमेव पराभव होता. यानंतर, सुपर सिक्सच्याच दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेच्या संघाचा सात विकेट राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. भारतीय संघ सात गडी राखून अंतिम सामना जिंकून चॅम्पियन ठरला.

पुढील महिन्यात होणाऱ्या सीनियर महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या अंडर-19 संघातील अनेक खेळाडूंची भारतीय संघात निवड होऊ शकते. शेफाली वर्मा व्यतिरिक्त श्वेता सेहरावत, पार्श्वी चोप्रा आणि ऋचा घोष या खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT