Dewald Brevis Batting Like AB de Villiers esakal
क्रीडा

Video: भारत जिंकला चर्चा मात्र 'BABY AB'ची

अनिरुद्ध संकपाळ

भारताच्या १९ वर्षाखालील संघाने १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत (U19 World Cup) दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली. (India vs South Africa) भारताने प्रथम फलंदाजी करताना २३२ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेला१८७ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. विकी ओस्तवारने २८ धावात ५ तर राजा बावा ने ४७ धावात ४ विकेट घतेल्या. असे असले तरी सामन्यात चर्चा मात्र दक्षिण आफ्रिकेच्या BABY AB चीच झाली.

दक्षिण आफ्रिकेने जरी १८७ धावाच केल्या असल्या तरी आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) ९९ चेंडूत ६५ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. (Dewald Brevis Batting Like AB de Villiers)

सामन्यावेळी त्याने भारतीय गोलंदाजांची अशी काही धुलाई केली की त्याचे फटके पाहून सर्वांनाच दक्षिण आफ्रिकेचा ३६० खेळाडू एबी डिव्हिलियर्सची आठवण झाली. ज्यावेळी डेवाल्ड ब्रेविसने आपले अर्धशतक पूर्ण केले त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या त्याच्या साथीदारांनी उभे राहून त्याच्या खेळीचे कौतुक केले. यावेळी एका खेळाडूच्या हातात 'BABY AB' लिहीलेला फलक होता. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. डेवाल्ड ब्रिविस हा आपल्या संघात बेबी एबी (BABY AB) नावाने प्रसिद्ध आहे.

भारताने ब्रेविसला ३६ व्या षटकात बाद केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज फार काळ टिकाव धरू शकले नाहीत. भारताने त्यांचा डाव १८७ धावात संपुष्टात आणला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार हीरडेनने ३६ धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT