U-19 World Cup esakal
क्रीडा

U-19 World Cup IND vs BAN: भारत - बांगलादेशचे कर्णधार भिडले; पंचांनी मध्यस्थी केली म्हणून...

भारत - बांगलादेश सामन्यावेळी राडा; Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

U-19 World Cup India vs Bangladesh : 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आज भारताने आपली मोहीम सुरू केली. गतविजेत्या भारताचा आज पहिलाच सामना हा कडवट बांगलादेश सोबत होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 7 बाद 251 धावा केल्या. कर्णधार उदय सहारनने 64 धावांची खेळी करत महत्वाचे योगदान दिलं. तर सलामीवीर आदर्श सिंगने 76 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली.

दरम्यान, सामन्यावेळी भारताचा कर्णधार उदय सहारन आणि बांगलादेशचा कर्णधार महफिजूर रहमान राबीसोबत वाद झाला. उदय आणि अरिफुल इस्माल हे एकमेकांसमोर आले होते. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार महफिजूर रहमान राबी देखील मधे पडला होता. अखेर प्रकरण वाढत असल्याचं पाहून पंचांनी मध्यस्थी करत दोन्ही देशांच्या खेळाडूंना बाजूला केलं. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

त्यानंतर अजून एक घटना घडली. बांगलादेशचे खेळाडू भारतीय खेळाडूंना आक्रमकपणे सेंड ऑफ देताना दिसले.

सामन्याबद्दल बोलायचं झालं नाणेफेक जिंकून बांगलादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी (7) आणि मुशीर खान (3) हे स्वस्तात बाद झाले.

मात्र यानंतर सलामीवीर आदर्श सिंह आणि कर्णधार उदय सहारन यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली. आर्दशने 76 धावांची तर उदयने 64 धावांची खेळी केली.

यानंतर आलेल्या प्रियांशू मोलिया आणि अरवले अवनिश यांनी प्रत्येकी 26 तर सचिन धसने 26 धावांचे योगदान दिलं. बांगलादेशकडून मारूफ म्रिधाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : विहीरीत पडलेल्या हरणास शेतकऱ्यांनी दिले जीवदान

दिग्पाल लांजेकरांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला; महाराजांची आग्रा स्वारी दिसणार, चित्रपटाचं नाव काय?

Maharashtra Politics: काँग्रेसचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत

Hasan Mushrif : ‘आम्ही केलं; आता जबाबदारी तुमची’ शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश

SCROLL FOR NEXT