India vs Pakistan esakal
क्रीडा

ठरलं! भारत - पाकिस्तान डिसेंबरमध्ये पुन्हा भिडणार

ख्रिसमसला अनुभवता येणार भारत पाकिस्तान थरार

अनिरुद्ध संकपाळ

दुबई : क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना भिडताना पाहता येणार आहे. १९ वर्षाखालील आशिया कप २०२१ (U19 Asia Cup 2021) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार २५ डिसेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहेत. हा सामना सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार आहे. यंदाचा आशिया कप (Asia Cup) हा दुबईमध्ये (Dubai) खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला २३ डिसेंबरपासून सुरुवात होत असून ३१ डिसेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे ९ वाजताच सुरु होणार आहेत. (U19 Asia Cup 2021 India Pakistan will play with each other on 25th december)

१९ वर्षाखालील आशिया कपमध्ये ग्रुप अ मध्ये भारत, (India) पाकिस्तान, (Pakistan) अफगाणिस्तान आणि युएई संघांचा समावेश आहे. तर ग्रुप ब मध्ये बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि कुवेत या संघांचा समावेश आहे. ग्रुप ए मधील सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. तर ग्रुप ब मधील सर्व सामने शाहजाहमध्ये होणार आहे.

आशिया कप ( १९ वर्षाखालील ) भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक (U19 Asia Cup 2021)

२३ डिसेंबर भारत विरुद्ध युएई

२५ डिसेंबर भारत विरुद्ध पाकिस्तान

२७ डिसेंबर भारत विरुद्ध अफगाणिस्तान

भारताचा आशिया कपसाठीचा १९ वर्षाखालील संघ (U19 Asia Cup 2021)

हरनूर सिंह पन्नू, अंगक्रीश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश ढूल ( कर्णधार ) अनेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना ( यष्टीरक्षक ), आराध्या यादव ( यष्टीरक्षक ), राजंगद बावा, राजवर्धन हैंगरगेकर, गर्व सांगवान, रवी कुमार, रिशिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विक्की ओस्तवाल, वासू वत्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT