YashDhull
YashDhull Sakal
क्रीडा

U 19 WC 2022 : यश धूलचं विक्रमी शतक; कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

सुशांत जाधव

India vs Australia,U19 World Cup 2022 : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा कर्णधार यश धूलनं (India U 19 Captain Yash Dhul ) विशेष छाप सोडली. ऑस्ट्रेलिया (Australia U19 ) विरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार शतक करत संघाला मजबूत स्थितीत नेऊन पोहचवले. भारतीय संघ संकटात असताना त्याने शतकी खेळीनं संघाचा डाव नुसता सावरला नाही तर कांगारुंसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.

यश धूलनं (Yash Dhul) 110(110) शेख राशीदच्या (Shaik Rasheed) 94(108) साथीने तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत कांगारुंसमोर मोठी धावसंख्या उभारली. भारतीय संघाने (India U19 Innings) निर्धारित 50 षटकात 290 धावा केल्या. यश धूलनं शतकी खेळीसह खास विक्रम आपल्या नावे केला. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत शतकी खेळी करणारा भारताचा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यश धूलच्या आधी विराट कोहलीने (Virat Kohli) 2008 च्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत शतकी खेळी केली होती. त्यानंतर उन्मुक्त चंदने 2012 च्या स्पर्धेत शतक ठोकले होते.

यश धुलने 110 चेंडूत 110 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. दुसऱ्या बाजूला शेख राशीदनं त्याला उत्तम साथ दिली. त्याने 108 चेंडूत 94 धावा केल्या. या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत नॉक आउटमध्ये शतकी खेळी करणारा यश धूल हा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी चेतेश्वर पुजाराने 129 धावा, उन्मुक्त चंदने 111 धावा, रवनीत रिकीने 108 धावा तर यशस्वी जयस्वालनं 105 धावांची खेळी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT