U19 World Cup 2024 esakal
क्रीडा

U19 World Cup 2024 : भविष्यातील भारतीय संघाचे 'पाच' शिलेदार; U19 वर्ल्डकप गाजवला आता...

'Five' pillars of the future Indian Cricket team : यंदाच्या U19 वर्ल्डकपमध्ये अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

U19 World Cup 2024 : भारताच्या 19 वर्षाखालील संघाने अंतिम फेरीत धडक मारली असून 11 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्यासोबत या युवा संघ विजेतेपदासाठी भिडणार आहे. भारतीय युवा संघ सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्यापासून एकच पाऊल दूर आहे.

भारतीय संघाला फायनल कोणासोबत आहे याच्याशी काही घेणंदेणं नाही. कारण भारतीय संघाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत समोर येणाऱ्या प्रत्येक विरोधी संघाला जोरदार टक्कर दिली आहे. या अशा दमदार संघातील पाच खेळाडू असे आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीने भारतीय संघाचं भविष्य किती उज्वल आहे हे दाखवून दिलं.

कर्णधार उदय सहारन

उदय सहारनने यंदाच्या वर्ल्डकमध्ये कामगिरीत कमालीचं सातत्य दाखवलं आहे. ज्यावेळी भारताचे टॉप 4 फलंदाज 32 धावांवर बाद झाले होते. त्यावेळी त्याने सचिन धस सोबत 171 धावांची भागीदारी रचली. भारताचा विजय निश्चित केला. उदय सहारन हा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 389 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा कव्हर ड्राईव्ह जबरदस्त आहे.

मुशीर खान मिस्टर 360 डिग्री

सरफराज खानचा भाऊ मुशीर खान हा सूर्यासारखा मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो अतरंगी फटक्यांसोबत क्लासिक शॉट्स देखील चांगला खेळतो. त्याला सेमी फायनल सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही .मात्र त्याने 6 सामन्यात 336 धावा केल्या असून त्याचे स्ट्राईक रेट हे 100 पेक्षा जास्त आहे. त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकली. त्याची तुलना सूर्यकुमारशी होत आहे.

फसलेला सामना काढून देणारा सचिन

सचिन धस हा मराठमोळा फलंदाज ज्यावेळी सामना फसतो त्यावेळी आपली कामगिरी उंचावून संघाला अडचणीतून बाहेर काढलं. सचिन धसचे नाव सचिन तेंडुलकरच्या नावावरच ठेवण्यात आलं आहे. त्याचे वडील सचिन तेंडुलकरचे फॅन आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव सचिन ठेवलं. ते स्वतःही क्रिकेटपटू होते.

सचिनने वर्ल्डकपमध्ये 294 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. सेमी फायनलमध्ये अडचणीच्या वेळी त्याने 96 धावांची सामना जिंकून देण्यारी खेळी केली.

राज लिम्बानीचं अष्टपैलुत्व

राज लिम्बानी स्पर्धा जसजशी पुढे जात आहे तसतसे रंगात येत आहे. सेमी फायनल सामन्यात या वेगवान गोलंदाजाने 3 विकेट्स घेतल्या. त्याने स्पर्धेत आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या असून त्याने फलंदाजीतीही चमक दाखवली. त्याने आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात नाबाद 13 धावांची महत्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सौम्य पांडे छोटा जडेजा

भारतीय संघाला डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांची चांगली परंपरा लाभली आहे. त्यात आता अजून एका डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाची भर पडली आहे. सौम्य पांड्याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

त्याच्या फिरकीच्या जाळ्यात विरोधी संघाचे फलंदाज अलगद अडकतात. आफ्रिकेतील वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवरही सौम्यच्या फिरकीचा बोलबाला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT